शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

कोल्हापूर : आझाद गल्लीतील नागरिकांची महापालिकेत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 3:32 PM

भाऊसिंगजी रस्त्याला लागून असलेल्या आझाद गल्लीत अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ पसरली असून, याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिकांनी बुधवारी दुपारी महानगरपालिकेत जाऊन निदर्शने केली.

ठळक मुद्दे आझाद गल्लीतील नागरिकांची महापालिकेत निदर्शनेअस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ असल्याचा आरोप

कोल्हापूर : भाऊसिंगजी रस्त्याला लागून असलेल्या आझाद गल्लीत अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ पसरली असून, याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिकांनी बुधवारी दुपारी महानगरपालिकेत जाऊन निदर्शने केली.

यावेळी नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना निवेदन दिले. दरम्यान, तक्रारी आल्यानंतर मंगळवारपासून विशेष मोहीम घेऊन परिसरात स्वच्छतेबाबत खबरदारी घेतली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.आझाद गल्ली अरुंद असून तेथील गटारी तुंबलेल्या आहेत. खासगी इमारतींच्या बेसमेंटमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूची साथ पसरली असल्याची या परिसरातील नागरिकांची तक्रार होती. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचीही तक्रार काहींनी केली. त्यानंतर या परिसरात मंगळवारपासून विशेष मोहीम घेऊन स्वच्छता करण्यात आली. डास अंडीनाशक औषध, धूरफवारणीही करण्यात आली.याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी आझाद गल्ली येथे जाऊन परिसराची पाहणी केली. तसेच काही रुग्णांची विचारपूस केली. आझाद गल्ली येथील डॉ. हितेश गांधी यांच्या रुग्णालयात जाऊन रुग्णांवर केलेल्या उपचारांची तसेच त्यांच्या रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल तपासले. त्यावेळी त्यांना डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे आढळून आले. मात्र त्यांपैकी कोणालाही डेंग्यू झाला नसल्याची बाब समोर आली.

त्यावेळी डॉ. पाटील यांनी डॉ. गांधी यांची कानउघाडणी करीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल असे वागू नका, असा सल्ला दिला. मात्र नागरिकांनी डॉ. गांधी यांचीच बाजू घेत डॉ. पाटील यांचीच उलटतपासणी घेण्याचा प्रयत्न केला.दुपारी चार वाजता नागरिक आयुक्तांनी भेटण्यासाठी महानगरपालिकेत गेले. त्यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे नागरिक जेथे बैठक सुरू होती, त्या ताराराणी सभागृहाकडे गेले. त्यांना दरवाजावर रोखण्यात आले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर तेथे पोहोचले. पाठोपाठ डॉ. पाटीलसुद्धा तेथे गेले. मात्र आयुक्तांनी बाहेर येऊन चर्चा करावी, असा आग्रह काही नागरिकांनी धरला.

आयुक्तांनी त्यांना ‘आपल्या कार्यालयात बसा, मी येतो,’ असा निरोपही दिला. मात्र त्याने समाधान न झाल्याने नागरिकांनी अचानक आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात झाली. डॉ. पाटील, नगरसेवक ईश्वर परमार यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

गेले दोन दिवस आझाद गल्ली परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. संपूर्ण शहरभर डासनाशक औषध, धूरफवारणी केली जात आहे. खासगी शौचालयांच्या पाईपला फडकी बांधली जात आहेत. नागरिकांनी स्वत:देखील यात पुढाकार घेणे आवश्यक आहे.- डॉ. दिलीप पाटील, आरोग्याधिकारी

आझाद गल्ली येथे रोजच्या रोज स्वच्छता केली जाते. कचरा उठाव केला जातो. महापालिका आरोेग्य विभाग कुठेही कमी पडलेला नाही. गेल्या दोन दिवसांत ज्या-ज्या ठिकाणी पाणीची डबकी दिसून आली, तेथे औषधे टाकण्यात आली आहेत. मी स्वत: भागात फिरती करीत आहे.- ईश्वर परमार, नगरसेवक 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर