कोल्हापूर : येत्या सोमवारपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध वाहनांचे शुल्क आॅनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. हे शुल्क नियमित पद्धतीने कार्यालयातच स्वीकारावेत. अशी मागणी कोल्हापूर जिल्हा अॅटो रिक्षा संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित सावंत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.आॅटो रिक्षाचालकांना शुल्काव्यतिरिक्त जादाचे पैसे भरणे म्हणजे विनाकारण भुर्दंड बसणार आहे; त्यामुळे नियमितपणे रिक्षाचालकांचे शुल्क कार्यालयातच स्वीकारावेत; कारण शुल्काव्यतिरिक्त इंटरनेटधारकांकडून शुल्क भरणा पावती व अर्जासाठी किमान १00 ते १५0 रुपये जादाचे आकारले जातात; त्यामुळे हा भुर्दंड आॅटोरिक्षाचालकांना परवडणारा नाही; त्यामुळे अशा पद्धतीने शुल्क आकारणी करू नये, असे या निवेदनात म्हटले आहे.यावेळी समितीचे सचिव सुभाष शेटे, राजेंद्र जाधव, सरफुद्दीन शेख, बबलु घोरपडे, मोहन बागडी, ईश्वर चन्नी, अरुण घोरपडे, आदी रिक्षाचालक उपस्थित होते.