शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण: गावांना सांडपाणी प्रकल्पासाठी परवानगीच नाही, शासनाचा अजब नियम 

By समीर देशपांडे | Published: June 20, 2024 3:35 PM

मोठ्या गावांचे सांडपाणी थेट पंचगंगेत

समीर देशपांडे

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांपासून प्रधान सचिवांपर्यंत अनेकांनी पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी बैठका घेतल्या. परंतु यासाठी आवश्यक निधी आणि शासनानेच घातलेली काही बंधने याबाबत एकही जण अवाक्षर काढत नाही. ग्रामीण भागात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी शासनाची परवानगीच नसल्याने प्रदूषण नियंत्रण काय डोंबाल करणार काय, असा प्रश्न विचारावसा वाटत आहे.पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला १७१, ८९ की ३९, किती गावे नेमकी कारणीभूत आहेत, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्याची गरज आहे. पंचगंगा नदीकाठी नगरपालिका आणि नगरपंचायतीपेक्षा अधिक लोकसंख्येची अनेक गावे आहेत. हातकणंगले तालुक्यातील एकट्या पुलाची शिराेली ग्रामपंचायतीची लोकसंख्या ६० हजार ५०० इतकी आहे. इचलकरंजीजवळच्या कबनूर ग्रामपंचायतीची लोकसंख्या ४१ हजार ०९४ इतकी आहे. याउलट मुरगूड नगरपालिकेची लोकसंख्या ११ हजार १९४ आहे, तर हुपरी नगरपालिकेची लोकसंख्या २८ हजार ९५३ इतकी आहे. शिरोली, कबनूरसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असूनही केवळ त्या ग्रामीण भागात आहेत म्हणून त्यांना शासन नियमानुसार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करता येत नाही. तो फक्त नागरी भागासाठीच मंजूर करण्याची अट आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ठिकाणी केवळ शोषखड्डे, मॅजिक पिट, पाझर खड्डा, स्थिरीकरण तळे, कन्स्ट्रक्टेड वेट लॅण्ड यासारखे छोट्या गावांसाठी उपयुक्त असलेल्याच उपाययोजना कराव्या लागतात. परंतु मोठ्या ग्रामपंचायतींचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने अशा ग्रामपंचायतींना सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे.दुसरा मुद्दा लोकसंख्या आणि त्यानुसार स्वच्छ भारत मिशनमधून दिल्या जाणाऱ्या निधीबाबतचा आहे.पंचगंगा प्रदूषणासाठी ज्या १८ गावांतील मोठ्या प्रमाणावरील सांडपाणी कारणीभूत ठरते त्या गावची प्रत्यक्ष लोकसंख्या आणि शासन नियमानुसारची लोकसंख्या, यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनमधून मिळणाऱ्या निधीवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात येत असल्याने प्रत्यक्ष लोकसंख्येच्या आधारे मिशनमधून १८३ कोटी रुपये मिळणे आवश्यक असताना कागदोपत्री अधिकृत लोकसंख्या प्रचंड कमी असल्याने केवळ २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

वास्तव समजून निधीची गरजचंदूर, कबनूर, कोरोची, पट्टणकोडोली, तळसंदे, गांधीनगर, कळंबा तर्फ ठाणे, मोरेवाडी, पाचगाव, शिंगणापूर, उचगाव, वसगडे, गडमुडशिंगी, नृसिंहवाडी या गावांची लोकसंख्या प्रत्यक्षात अधिक असून, स्वच्छ भारत मिशनच्या निकषानुसार ती कमी असल्याने या गावांसाठी अतिशय कमी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचे वास्तव समजून निधी मंजूर करण्याची गरज आहे.

नळांना मीटर बसवण्यासही प्राधान्य हवेगावोगावी पाण्याची वारेमाप उधळपट्टी केली जाते. अनेक ठिकाणी सार्वजनिक नळ बंद केले जात नाहीत. खासगी नळाचे पाणीही बेसुमारपणे वापरण्यात येते. नळांना मीटर बसवण्याची सक्ती नसल्याने वाट्टेल तसे पाणी वापरले जाते आणि त्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर तयार होते. नळांना मीटर बसवले तरी सांडपाण्याच्या निर्मितीत घट होणार आहे आणि पंचगंगेत मिसळणारे सांडपाणीही घटणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीpollutionप्रदूषण