फोटो क्रमांक - ०७०६२०२१-कोल-कोल्हापूर गर्दी०१/०२/०३
ओळ- कोल्हापूर शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यात आले. त्यामुळे शहरातील विविध बाजारपेठेत, विविध रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली. रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो क्रमांक - ०७०६२०२१-कोल-सलून
ओळ - कोल्हापुरातील निर्बंध शिथिल झाल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली सलूनची दुकाने सोमवारपासून सुरू झाली. त्यामुळे अनेकांनी ही संधी साधत आपला डोक्यावरील भार हलका केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो क्रमांक - ०७०६२०२१-कोल-घरफाळा गर्दी
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांसाठी ३० जूनपूर्वी घरफाळा भरल्यास बिलात सहा टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांचा कर भरण्याकडे कल आहे. मात्र सोमवारी सर्व्हर डाऊन, नेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण झाल्याने गांधी मैदान कार्यालयासमोर अशी रांग लागली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो क्रमांक - ०७०६२०२१-कोल- मॉर्निंग वॉक०१/०२
ओळ - कोल्हापुरात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी या संधीचा लाभ घेत बऱ्याच दिवसांनी फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटला. (छाया : आदित्य वेल्हाळ)