शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

कोल्हापूर : ‘भीमवंदना’ मुळे पोलीस बंदोबस्त नाकारला, गांधीनगर बेकायदा इमारतीवर कारवाई स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 6:06 PM

गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतच्या हद्दीतील बेकायदेशीर इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई बुधवारी पोलिसांनी बंदोबस्त नाकारल्यामुळे स्थगित करण्याची नामुष्की महानगरपालिका प्रशासनावर ओढवली. पोलीस बंदोबस्ताची रीतसर झालेली मागणी, त्यानंतर पोलिसांकडून बंदोबस्ताचे मिळालेले आश्वासन आणि त्याच्या जोरावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून केलेली पूर्वतयारी या सर्व प्रयत्नांवर अचानक पाणी फिरले. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचीही महापालिका वर्तुळात चर्चा सुरू होती.

ठळक मुद्दे‘भीमवंदना’ मुळे पोलीस बंदोबस्त नाकारलागांधीनगर रस्त्यावरील बेकायदा इमारतीवर कारवाई स्थगित

कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतच्या हद्दीतील बेकायदेशीर इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई बुधवारी पोलिसांनी बंदोबस्त नाकारल्यामुळे स्थगित करण्याची नामुष्की महानगरपालिका प्रशासनावर ओढवली. पोलीस बंदोबस्ताची रीतसर झालेली मागणी, त्यानंतर पोलिसांकडून बंदोबस्ताचे मिळालेले आश्वासन आणि त्याच्या जोरावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून केलेली पूर्वतयारी या सर्व प्रयत्नांवर अचानक पाणी फिरले. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचीही महापालिका वर्तुळात चर्चा सुरू होती.शहराच्या पूर्वेकडील भागात असलेल्या तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतची हद्द महानगरपालिकेची की उचगाव ग्रामपंचायतीची यावरून गेली काही वर्षे वाद सुरू होता. प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले. न्यायालयाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागास नागरिकांच्या हरकती घेऊन ही हद्द कोणाची, याचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून सर्व कागदपत्रे, पुरावे लक्षात घेता ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचे सांगितले.न्यायालयात २०१४ ला या संदर्भात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे जागेची मालकी महापालिकेची असल्याचा निर्वाळा देतानाच न्यायालयाने २०१४ नंतरच्या बेकायदेशीर इमारती तोडण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अशा १९ इमारती महानगरपालिकेच्या ‘हिट लिस्ट’वर आल्या. या इमारती तत्काळ तोडाव्यात, अशी मागणी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत तसेच विविध राजकीय पक्षांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. त्यामुळे स्वाभाविक दबाव असलेल्या महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसापासून या १९ बेकायदेशीर इमारती तोडण्याची तयारी केली होती.नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कारवाईचे सर्व नियोजनही केले. पोलीस बंदोबस्तही मागितला. पोलीस प्रशासनाने दिलेल्या तारखेनुसार बुधवारी कारवाई करण्याचे ठरले.

महापालिकेच्या यंत्रणेसह भाड्यानेही काही वाहने, के्र न, पोकलॅन घेतले होते; परंतु अचानक पोलिसांनी बंदोबस्त नाकारला. त्यामुळे पालिका अधिकारी अडचणीत आले. अखेर बुधवारी सकाळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्याशी चर्चा केली.

शहरात बुधवारी सायंकाळी ‘भीमवंदना’ कार्यक्रम असल्याने आणि तो उधळून लावण्याचा काही संघटनांनी इशारा दिल्यामुळे पोलीस बंदोबस्त देऊ शकत नाही. तथापि, गुरुवारी ही कारवाई करण्याचे नियोजन करावे, असे मोहिते यांनी आश्वासित केले आहे. त्यामुळे आता ही कारवाई एक दिवसाने पुढे जाते की, आणखी काही दिवस हे मात्र पाहावे लागणार आहे.

राजकीय हस्तक्षेपाची शक्यतागेल्या चार-पाच वर्षांपासून या बेकायदेशीर बांधकामांचा विषय गाजत आहे. त्यातून न्यायालयीन लढाईसुद्धा झाली. या प्रकरणात पहिल्यापासून राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा नेहमीच होत राहिली. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता कारवाई होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले असतानाच अचानकपणे खो घातला गेल्याने पोलिसांवरही आता दबाव आला की काय, अशी चर्चा नव्याने सुुरू झाली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका