कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच ‘फ्रंट लाईन वॉरिअर्स’ म्हणून पोलिसांनीही सेवा बजावली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपाठोपाठ आता सोमवारपासून कोल्हापूर पोलिसांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. शहरातील लाईन बाजार सेवा रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटलसह जिल्ह्यात एकूण आठ आरोग्य केंद्रांत ही लस देण्यात येत आहे. पहिल्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, आदी आधिकाऱ्यांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. पुढे सर्वच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.
फोटो नं. ०८०२२०२१-कोल-पोलीस कोरोना डोस
ओळी : कोल्हापूर पोलीस दलात ‘फ्रंट लाईन वॉरिअर्स’ म्हणून सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी लाईन बाजार सेवा रुग्णालयात गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.