शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

कोल्हापूर: प्राथमिक शिक्षक बँकेत राजाराम वरुटे पॅनेलचा उडाला धुव्वा, १३ वर्षांनंतर सत्तांत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 12:54 PM

यंदा तिरंगी लढत झाल्याने बँकवर कोणाचे वर्चस्व राहणार हे काही तासात स्पष्ट होईल.

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक निवडणुकीत अखेर तेरा वर्षांनंतर सत्तांत्तर झाले. विरोधी पॅनेलने सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उठवत बँकेवर सत्ता मिळवली. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या सत्तेला विरोधी पॅनेलने सुरुंग लावला. विरोधी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष जोतिराम पाटील व शिक्षक संघाचे थोरात गट रवि पाटील आदींच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीने एकतर्फी विजयी मिळवला.

काल, रविवारी मोठ्या चुरशीने ९७.७३ टक्के मतदान झाले. मतमोजणीच्या प्रारंभीसच विरोधी पँनेलनी जोरदार मुसंडी मारली होती. करवीर, पन्हाळा, हातकणंगले मतदारसंघातील विरोधी पँनेलचे तिघे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे पहिला गुलाल विरोधी पँनेलने उधळला. हा गुलाल कायम राखत विरोधी पॅनेलने बँकेवर वर्चस्व मिळवले.शिक्षक बँकेच्या १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात होते. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ पॅनेल, शिक्षक संघाचे (थोरात गट) जिल्हाध्यक्ष रवी पाटील, समितीचे जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक पॅनेल’ व ‘पुरोगामी’चे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘पुरोगामी, संघ, समिती परिवर्तन पॅनेल अशी तिरंगी लढत झाली.राजाराम वरुटे यांच्या सत्तेला सुरुंगशिक्षक समितीचे नेते कृष्णात कारंडे व बँकेच्या माजी संचालिका लक्ष्मी पाटील या अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे गुरुजींचे राजकारण चांगले तापले होते. शिक्षक बँकेची सत्ता गेली १३ वर्षे राजाराम वरुटे यांच्याकडे आहे. अखेर वरुटे यांच्या सत्तेला सुरुंग लावत विरोधी पॅनेलने बँकेवर वर्चस्व मिळवले.मतदानाचा टक्का वाढलागेल्या पंचवार्षिकपेक्षा मतदानाचा टक्का वाढला आहे. इर्षेने एक एक मतदार बाहेर काढल्याने ही टक्केवारी वाढली आहे. या वाढलेल्या टक्केवारीचा विरोधी पॅनेलला फायदाच झाल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले.

तालुकानिहाय झालेल्या मतदान, टक्केवारीकरवीर- ९५.८९शिरोळ- ९८.४९हातकणंगले- ९८.९४पन्हाळा- ९६.९२शाहूवाडी- ९६.०१राधानगरी- ९७.६४भुदरगड- ९८.६४कागल- ९८.०८गडहिंग्लज- ९८.८८आजरा- ९९.६५चंदगड- ९८.६५गगनबावडा- ९७.१६

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकbankबँकElectionनिवडणूक