कोल्हापूर : सादळे -मादळे (ता. करवीर) येथील सिल्व्हर व्हॅली या लॉजिंगवर पोलीसांनी गुरुवारी (दि. १८) छापा टाकून तिन पानी जुगार खेळणाऱ्या तेरा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सव्वा लाख रुपये व ११ मोबाईल असा सुमारे दोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मूख सूत्रधार खासगी सावकार सूरज हणमंत साखरे (वय ३०, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) आणि जयदीप अतिग्रे पसार झाले.या जुगार अड्डयाची सर्वस्वी व्यवस्था साखरे व अतिग्रे यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी पोलीसांनी साखरे यांच्या पीरवाडी (ता. करवीर) येथील माळरानावरील साई कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बंद खोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून साखरेसह १९ जणांना अटक केली होती.
संशयित विनोद भिमराव डकरे (वय ४२, रा. जाधववाडी, ता. करवीर), अमोल अजित कुदळे (३६, रा. दुधगांव, ता. मिरज, जि. सांगली), प्रकाश बाबुराव पाटील (४०, रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर), ऋषीकेश रणजीत पोवार (३१, रा. राधानगरी), प्रकाश धोंडू पाटील (३१, रा. गारुडी, ता. गगनबावडा), रणजीत बाबुराव पाटील (३१, रा. किरुळे, ता. गगनबावडा), तानाजी श्रीपती जाधव (३०, रा. कळे, ता. पन्हाळा), समाधान धोंडीराम गुरव (३०, रा. पाटपन्हाळा), रविंद्र शामराव पाटील (२७, रा. काळजवडे, ता. पन्हाळा), तानाजी राम विटेकर (३२, रा. आकुर्डे, ता. पन्हाळा), महेश रावसाहेब चौगुले (४३, रा. न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर), सागर सुभाष पाटील (३२, रा. मंगळवार पेठ), परशुराम शामराव कांबळे (३२, रा. गारीवडे, ता. गगनबावडा) यांना अटक केली.