कोल्हापूर : महावितरण कंपनीने केलेल्या अन्यायी दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतला आहे. शुक्रवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरणवर धडक मोर्चा नेण्यात येणार आहे.विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या मागण्यांसाठी याआधी पाठिंबा देत होते. परंतू ते सत्तेवर आल्यानतंर मात्र उदयोजकांवर ही दरवाढ लादली आहे. म्हणूनच यापुढे आम्हांलाही सरकारने गृहित धरू नये असा इशारा यावेळी देण्यात आला.उद्योजकांनी घेतलेल्या या निर्णयाला विविध संघटनांनीही पाठिंबा दिला असून आपापले उद्योग, व्यवसाय बंद ठेवून कामगारांसह सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवारी सकाळी १0 वाजता सासने मैदानावर सर्वजण एकत्र येणार असून तेथून दाभोळकर कॉनर्र, स्टेशन रोडवरून जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा जाईल. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. यानंतर महावितरणवर मोर्चा नेण्यात येणार आहे.यावेळी हरिभाई पटेल, उजजवल नागेशकर, प्रदीप कापडिया,अमोल कोरगावकर, सचिन शहा, धनंजय दुग्गे,शिवाजीराव पोवार यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करून पूर्ण ताकतीने या मोर्चामध्ये उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.