कोल्हापूर - रूकडी रेल्वेस्थानकावर सर्व जलद गाडी थांबविण्यात यावेत यासह अनेक मागणी करिता सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली रूकडी रेल्वेस्थानक येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले..आंदोलनदरम्यान पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यात झटापट झाली. दरम्यान रेल्वे विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांनी 1 महिन्या मध्ये सर्व मागण्या मान्य करणेचे आश्वासन रुकडी रेल्वे स्टेशन अधीक्षक जी डी रायकवार यांच्या मार्फत आंदोलकाना दिल्यानंतर रेल्वे रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
रूकडी येथून कोल्हापूर व गांधीनगर येथे नोकरी व व्यवसाय निमित्त दररोज हजारो प्रवाशी ये जा करत असतात. कोरोना काळापासून गांधीनगर, रूकडी स्थानकावर जलद गाडी थांबण्याचे बंद झाले आहेत.यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत असून आर्थिक भुर्दड सोसावे लागत आहे.शिवाय वेळ व मनस्ताप सोसावे लागत आहे.
रूकडी येथील भुयार मार्ग धोकादायक बनला असून भुयार मार्गावरील समस्या सोडविण्यात यावा. रूकडी लगत रूकडी चौकी येथे उभारण्यात आलेला पुल येथे अपघाताची मालिका सुरू आहे.याठिकाणी पर्यायी मार्ग सुरू करण्यात यावे. रेल्वे स्थानकास छञपती शाहू महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषाने भेट दिले असून रेल्वे स्थानक विकसित करा.कोल्हापूर , मिरज ,सांगली करिता तासाला लोकल गाडी सुरू करा.पॅसजेर रेल्वे तिकीट दर कमी करा.स्थानकावर आवश्यक सुविधा सुरू करा याकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते.
दरम्यान रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयातून रुकडी भुयारी मार्गातील समस्या सोडविण्यासाठी 75 लाख रु निधी मंजूरी केल्याचे पञ दाखविण्यात आले.त्याचबरोबर भुयारी मार्गा चे लवकरच काम सुरु करत असल्याचे विभागीय अधिकारी ने सांगितले. एक्सप्रेस रेल्वे रुकडी आणि गांधीनगर येथे थांबविण्यात यावे . इतर मागणी एक महिन्यात मंजूर न झाल्यास पुन्हा आंदोलन करणेचा इशारा दिला.
आंदोलन मध्ये अमितकुमार भोसले, सरदार शेख, कुमार चव्हाण,सुनील भारमल,हनीफ पाटिल, संजय कोळी, जीतू देसाई,सुरेश लोखंडे, डी आर माने, बाळासो लोहार,अमर आठवले,सूरज नामे, आबु मुजावर, आप्पासो कापसे सह प्रवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.