शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कोल्हापूर : राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा, सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 7:18 PM

हंगाम सुरू होण्यापुर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे ऊसाची पहिली उचल द्या अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखानदार व व्यापाऱ्यांच्या संगनमताने साखरेचे दर पाडले, त्यामुळे गेले दोन महिन्यातील साखर खरेदी व विक्रीची चौकशी करण्याची मागणी आयकर विभाग, ‘ईडी’, ‘सीबी’ कडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपंधरा दिवसात ठरल्याप्रमाणे उचल द्या अन्यथा फिरणे मुश्कील करू : राजू शेट्टींशेट्टींचा कारखानदारांना इशारासाखर खरेदी-विक्रीच्या चौकशीची मागणीसहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा

कोल्हापूर : हंगाम सुरू होण्यापुर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे ऊसाची पहिली उचल द्या अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखानदार व व्यापाऱ्यांच्या संगनमताने साखरेचे दर पाडले, त्यामुळे गेले दोन महिन्यातील साखर खरेदी व विक्रीची चौकशी करण्याची मागणी आयकर विभाग, ‘ईडी’, ‘सीबी’ कडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.साखरेचे दर घसरल्याने कारखान्यांनी शेतकरी संघटनेबरोबर झालेल्या समझोता बाजूला ठेवून प्रतिटन २५०० रूपये उचल देण्यास सुरूवात केली आहे. त्याला विरोध करत कारखान्यांवर कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

दुपारी तीन वाजता दसरा चौकातून मोर्चास सुरूवात झाली. सीपीआर मार्गे, महापालिका चौक, शिवाजी पुतळा, बिंदू चौक मार्गे सहसंचालक कार्यालयावर आला. तिथे सभेत रूपांतर झाले. यावेळी सर्वच वक्तयांनी साखर कारखानदारांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना मागण्यांचे निवेदन दिले.राजू शेट्टी म्हणाले, देशातील साखरेच्या उत्पादनाची माहिती संकलत करण्याची यंत्रणा केंद्र सरकारकडे नाही, ‘इसमा’, ‘दसमा’, साखर संघानी दिलेल्या माहितीच्या आधारेच धोरण ठरविले जाते. दुर्देवाने या यंत्रणेकडून खरी माहिती न दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. कारखान्यांच्या फायद्यावेळी उत्पादनाचे आकडे फुगवून सांगायचे आणि त्यांचा स्वारस्य संपला की दुसरा आकडा काढायचा, असे मटक्याचे आकडेवारी काढण्याचे धंदे बंद करा.

साखरेचे दर जाणीवपुर्वक पाडले जात असून कारखान्यांच्या अध्यक्षांनी दुसऱ्यांच्या नावावर कमी दराने खरेदी करायचे, साठेबाजी करून नंतर चढ्या दराने विक्री करण्याचे उद्योग सुरू आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो २८ रूपये दर आणि किरकोळ बाजारात ३८ रूपये कसा? शेतकऱ्यांचे वाटोळे करून ग्राहकांचीही लुट सुरू आहे.

गेले आठवड्यात रिझर्व्ह बॅँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी साखरेच्या कृत्रिम दर पाडण्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तीच मागणी आमची असून साखर दराचे तुणतुणे बंद करून प्रसंगी कर्जे काढा पण ठरल्याप्रमाणे आमचे पैसे द्या.प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, अनिल मादनाईक, सयाजी मोरे, विकास देशमुख यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शुभांगी श्ािंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर