कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागून शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले.युवा सेनेने कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. यामध्ये नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार शनिवार पेठ येथील शहर कार्यालयात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, पद्माकर कापसे, ऋतुराज क्षीरसागर, अरुण सावंत, आदींची प्रमुख उपस्थिती होती.क्षीरसागर म्हणाले, सर्वांना प्रमुखपद मिळावे ही साहजिकच अपेक्षा असते; परंतु हवे असलेले पद मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नये. पक्षनेतृत्वाने दिलेल्या पदाला साजेसे काम करून त्याची शोभा वाढवावी. यातूनच कार्यकर्ता मोठा होत असतो. यावेळी कपिल सरनाईक, ओंकार परमणे, अक्षय कुंभार, शिवतेज सावंत, युवराज भोसले, ओंकार तोडकर, आदी उपस्थित होते.
यांच्या झाल्या निवडीकोल्हापूर दक्षिण, उत्तर व करवीर मतदार संघाच्या जिल्हा समन्वयकपदी- योगेश चौगुले, जिल्हा चिटणीसपदी अविनाश कामते, युवा शहर अधिकारीपदी पीयूष चव्हाण, चेतन शिंदे (उत्तर), विश्वजित साळुंखे (दक्षिण), उपजिल्हा युवा अधिकारीपदी प्रशांत जगदाळे, कोल्हापूर उत्तरच्या समन्वयकपदी शैलेश साळोखे, दक्षिणच्या समन्वयकपदी सागर पाटील, आय टी सेल अधिकारीपदी सौरभ कुलकर्णी व चैतन्य अष्टेकर अशा निवडी झाल्या.