कोल्हापूर : सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे प्रवाशांना या कार्डवर विशिष्ट रक्कम भरल्यास कुटुंबातील सदस्यांसह कुठेही प्रवास करता येणार आहे. ही योजना एक मेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार आहे.
त्यानंतर किमान शंभर रुपयांच्या पटीत कितीही पैसे भरता येणार आहेत. हे स्मार्ट कार्ड एकप्रकारचे प्री-पेड कार्ड असणार आहे. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून घेता येणार असून, एस.टी.च्या प्रत्येक आगारात हे स्मार्ट कार्ड मिळणार आहे.एस.टी.कडून मासिक पास दिले जातात. मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा लाभही घेत आहेत. मात्र, हा पास हस्तांतरणीय नसल्याने आणि प्रवास करावाच लागेल याची हमी नसल्याने अनेक प्रवासी पास घेत नसत.
आता स्मार्टकार्डच्या माध्यमातून नागरिकांना एक चांगला पर्याय समोर आला आहे. अनेकदा दूरच्या प्रवासामध्ये प्रवासी खासगी वाहनांचाही अवलंब करतात; परंतु या स्मार्ट काडर्मुळे एस. टी. लाच प्राधान्य दिले जाईल.
या गाडीचा घेता येणार फायदा...एसटीची साधी बस, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध या कोणत्याही बसने प्रवास करणे यामुळे शक्य होणार आहे. प्रत्येक प्रवाशाने केलेल्या प्रवासाचेच पैसे त्या कार्डामधून वजा होत राहतील. हे कार्ड रिचार्ज करण्याची सोय एसटीच्या आगारांमध्ये असेल, त्याबरोबरच आॅनलाईनदेखील रिचार्ज करता येणार आहे.
सुट्या पैशांचा वाद मिटणाररोख पैशांचा संबंध येणार नसल्याने सुट्या पैशांची चिंता राहणार नाही. त्यामुळे प्रवासी-वाहकांची यातून सुटका होणार आहे. परिणामी, प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊन वाद-विवाददेखील टाळले जाऊ शकतात. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची आता चिंता करण्याची गरज नाही.