कोल्हापूर : न्यायालयीन भरतीवर स्थगिती उठवल्यानंतर मंगळवारपासून पुन्हा आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. राज्यात लघुलेखक, लिपिक व शिपाई / हमाल या पदांसाठी एकूण ८९२१ जागा आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्हयात २५८ जागा भरण्यात येणार आहे. शनिवार (दि. १२) सायंकाळ ५.३० वा. पर्यंत आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे.राज्यातील न्यायालयात लघुलेखकसाठी (स्टेनो) १०१३, लिपिकसाठी (क्लार्क) ४७३८ तर शिपाई / हमाल या पदासाठी ३१७० अशा एकूण ८९२१ जागा भरण्यात येणार आहेत. त्यात कोल्हापूर जिल्हयात लिपिकसाठी ११०, शिपाई ११२ व लघुलेखक ३६ अशा एकूण २५८ जागा भरण्यात येणार आहे.
आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असल्याने राज्यातील संपूर्ण अर्जदारांची यादी ३१ मे रोजी लागणार आहे. त्यानंतर कनिष्ठ पदासाठी आवश्यक असलेल्या मराठी टंकलेखनाची आठ जुलैला परिक्षा होईल. त्याचा निकाल १३ जुलैला लागणार आहे.२२ जुलैला इंग्रजी टंकलेखनाची परिक्षा होईल व याचा निकाल २६ जुलैला लागेल. लघुलेखक पदासाठी इंग्रजीची परिक्षा २८ जुलै तर २९ ला मराठीची परिक्षा होणार आहे. याचा एक आॅगस्टला निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आले.