शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं’च्या गजरात रेणुकादेवीची अंबील यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 6:22 PM

भल्या पहाटे रेणुकादेवीला अभिषेक, आरती, पालखी, भाजी-भाकरी, अंबिलीचा नैवेद्य अशा धार्मिक विधींनी आणि ‘उदं गं आई उदं’च्या गजरात शनिवारी ओढ्यावरील रेणुकादेवीची अंबील यात्रा झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली.

ठळक मुद्देभाजीभाकरीचा नैवेद्य : उदं गं आई उदं चा गजररेणुका देवीच्या अंबील यात्रेला अलोट गर्दी

कोल्हापूर : भल्या पहाटे रेणुकादेवीला अभिषेक, आरती, पालखी, भाजी-भाकरी, अंबिलीचा नैवेद्य अशा धार्मिक विधींनी आणि ‘उदं गं आई उदं’च्या गजरात शनिवारी ओढ्यावरील रेणुकादेवीची अंबील यात्रा झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली.मार्गशीर्ष महिन्यात सौंदत्ती येथील पौर्णिमा यात्रेनंतर भाविकांना वेध लागतात ते ओढ्यावरील रेणुकादेवीच्या अंबील यात्रेचे. मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी विधवा होते. त्या दिवसापासून देवी व तिचे जोगती कुंकू व सौभाग्यालंकारांचा त्याग करतात. अंबील यात्रा म्हणजे देवीला सांत्वनाचा घास भरवायचा. या दिवसापासून पुन्हा कुंकू व सौभाग्यालंकार घातले जातात.

यानिमित्त शुक्रवारी (दि. २८) सायंकाळीच ओढ्यावरील मंदिरातील सोनाबाई जाधव, रविवार पेठेतील बायाक्काबाई चव्हाण व गंगावेश येथील लक्ष्मीबाई जाधव या मानाच्या तीन जगांचे मंदिर परिसरात आगमन झाले. शनिवारी पहाटे तीन वाजता देवीचा व मानाच्या जगांचा अभिषेक झाला. अलंकारिक पूजा व आरती झाल्यानंतर पहाटे चार वाजल्यापासून नैवेद्य स्वीकारण्यास सुरुवात झाली.

मेथी, वरणे-वांग्याची भाजी, बेसनाची वडी, अंबिल, भाकरी, लिंबू, केळी, कांद्याची पात असा भरला नैवेद्य देवीला दाखविण्यात आला. दुपारी पुन्हा देवीची आरती व पालखी प्रदक्षिणा झाली. देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी पहाटेपासून भाविकांची मंदिर परिसरात अलोट गर्दी होती.

नैवेद्य दाखवून झाला की भाविक मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या रिकाम्या जागेत झाडाच्या सावलीत कुटुंबीयांसोबत बसून जेवणाचा लाभ घेत होते; तर लहान मुलांसह मोठी मंडळीही समोरील मैदानात मांडण्यात आलेल्या पाळणे, खेळण्याच्या साहित्यामध्ये बसून यात्रेचा आनंद घेत होती.

मंदिराच्या दुतर्फा गृहसजावट, खेळणी, इमिटेशन ज्वेलरीचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. येथे खरेदीचा मनसोक्त आनंद लुटत व खाद्यपदार्थांवर ताव मारत भाविकांनी यात्रेचा दिवस घालविला. रात्री देवीची आरती झाल्यानंतर मानाचे जग व सासनकाठी आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले.

एलईडी स्क्रीन, अंबील, सरबताची सोयमंदिराबाहेरील भाविकांनाही देवीचे दर्शन घडावे यासाठी बाह्य परिसरात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेच्या वतीने तसेच दीपक लोखंडे यांच्या वतीने अंबील, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने भाविकांना सरबताचे वाटप करण्यात आले. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर