- राजाराम लोंढे
कोल्हापूर - मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणार आहेत, पण त्या अगोदरच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मनोज जरांगे-पाटील यांनी २२ जानेवारीला मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत, मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता, मराठा समाजाला मोर्चा काढण्याची वेळ राज्य सरकार येऊ देणार नाही, त्या अगोदरच आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापुर्वी भारत जोडो यात्रा काढली, त्यानंतर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसला काय मिळाले? त्यामुळे त्यांच्या आगामी यात्रेला देशातील जनता प्रतिसाद देणार नाही.
क्रेडीट नको, पण जनतेची कामे होऊ देतकोल्हापूर शहरातील विकास कामांबाबत श्रेयवादाचे राजकारण सुरु असल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, आम्ही क्रेडीटसाठी कामे करत नाहीत, सगळे क्रेडीट त्यांना द्या, पण सर्वसामान्यांची कामे होऊ देत.