शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

कोल्हापूर : यूथ बॅँकेच्या व्यवहारांवर निर्बंध, रिझर्व्ह बॅँकेची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 1:24 PM

कोल्हापूर येथील यूथ डेव्हलपमेंट को-आॅप. बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेने कलम ३५ (ए) नुसार व्यवहार करण्यास निर्बंध आणले आहेत. कर्ज व ठेवींचे संतुलन न राखल्याचा ठपका ठेवत बॅँकेची सर्व खाती गोठविली आहेत. ग्राहकांना सहा महिन्यांत खात्यावरील केवळ पाच हजार रुपयेच काढता येणार आहेत.

ठळक मुद्दे यूथ बॅँकेच्या व्यवहारांवर निर्बंध, रिझर्व्ह बॅँकेची मोठी कारवाईकर्ज-ठेवींचे संतुलन न राखल्याचा ठपका : ‘गोकुळ’ कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले

कोल्हापूर : येथील यूथ डेव्हलपमेंट को-आॅप. बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेने कलम ३५ (ए) नुसार व्यवहार करण्यास निर्बंध आणले आहेत. कर्ज व ठेवींचे संतुलन न राखल्याचा ठपका ठेवत बॅँकेची सर्व खाती गोठविली आहेत. ग्राहकांना सहा महिन्यांत खात्यावरील केवळ पाच हजार रुपयेच काढता येणार आहेत.

या बॅँकेतून ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर कर्मचाऱ्यांचे इतर व्यवहारही होत असल्याने त्यांच्यातच एकच खळबळ उडाली आहे. या बॅँकेचे सध्या आर. बी. पाटील हे अध्यक्ष आहेत; पण बॅँकेवर माजी आमदार महादेवराव महाडिक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची स्थापनेपासून एकहाती सत्ता आहे. त्यामुळे या कारवाईचे जिल्ह्याच्या राजकारण व लोकसभा निवडणुकीतही पडसाद उमटणार आहेत.कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या यूथ बॅँकेच्या १२ शाखा आहेत. आर्थिक शिस्तीच्या बळावर बॅँकेने ४३ वर्षांत चांगलीच मुसंडी मारली; पण गेल्या काही वर्षांपासून बॅँकेचा आर्थिक स्तर घसरत गेला. बॅँकेच्या ठेवी १२० कोटी, तर कर्जांचे केवळ ३८ कोटींचे वाटप झाले. त्यांपैकी १७ कोटींची थकबाकी आहे. बॅँ

किंग धोरणानुसार ठेवींच्या प्रमाणात कर्जाचे वाटप नाही. त्याशिवाय स्वभांडवलही कमी झाले आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या निकषांनुसार एक लाखाच्या आत स्वभांडवल येता कामा नये. एकूणच बॅँकेच्या व्यवस्थापनाचा व्यवहार ठेवीदारांच्या हिताचा नसल्याचे रिझर्व्ह बॅँकेचे मत झाल्याने त्यांनी थेट कारवाई केली.

यूथ बॅँकेला व्यवहार करण्यास निर्बंध घातल्याने एकच खळबळ उडाली. बॅँकेचे एटीएमसह इतर व्यवहार रिझर्व्ह बॅँकेने बंद केले आहेत. ‘यूथ’चे व्यवहार असणाऱ्या बॅँकांना या बॅँकेचे खाते गोठविण्याचे आदेश दिले आहेत. निर्बंध घातल्याने सहा महिन्यांत खात्यावरील केवळ पाच हजार रुपयेच काढता येणार असल्याने ग्राहकांचे धाबे दणाणले.या बॅँकेतून ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांचे पगारही होतात. महिन्याला दोन ते अडीच कोटी रुपये पगार ‘गोकुळ’चा होतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम, काही दूध संस्थांची बिलेही याच बॅँकेतून होतात. हे सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. ‘गोकुळ’ कर्मचारी सोसायटी कर्मचाऱ्याना गृहबांधणीसाठी सात लाख रुपये एकरकमी कर्ज उपलब्ध करून देते.

कर्मचारी ही रक्कम घरी ठेवायला नको म्हणून या बॅँकेत ठेवतात. आता बॅँकेवर निर्बंध आल्याने अनेकांची चांगलीच अडचण झाली आहे. निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम अनेक कर्मचाऱ्यांनी या बॅँकेत ठेव म्हणून ठेवली आहे. त्यांचीही या कारवाईने पाचावर धारण बसली.दिवसभर शाखांत खलबतेरिझर्व्ह बॅँकेने कारवाईचे पत्र शनिवारी दुपारी यूथ बॅँकेसह तिच्याशी संलग्न बॅँकांना पाठविले. त्यानंतर ‘यूथ’चे संचालक मंडळ हडबडले. रविवारी दिवसभर बॅँकेच्या बहुतांशी शाखा सुरू होत्या.

ग्राहकांची घालमेलबॅँकेच्या ग्राहकांना ‘यूथ’वर रिझर्व्ह बॅँकेने केलेल्या कारवाईची रविवारी सकाळी कुणकुण लागल्यानंतर ग्राहकांनी अनेक शाखांमध्ये धाव घेतली. आपल्या खात्यावरील पैशाचे काय होणार? अशी विचारणाही ग्राहक करीत होते.

‘गोकुळ’ने कर्मचाऱ्यांना अ‍ॅडव्हान्स द्यावायूथ बॅँकेवर कारवाई झाल्याने सर्वाधिक अडचणी ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांची झाली. त्यांचा पगार या बॅँकेतून महिन्याच्या सात तारखेला होतो. आता तो होणार नसल्याने संचालकांनी आम्हाला एका पगाराचा अ‍ॅडव्हान्स द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. या बॅँकेचे दोन संचालक ‘गोकुळ’मध्येही सत्तेत असल्याने ही मागणी झाली आहे.

दृष्टिक्षेपात यूथ बॅँक

  1. स्थापना - १९७५
  2. कार्यक्षेत्र- कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
  3. शाखा - १२
  4. ठेवी- १२० कोटी
  5. कर्जे- ३८ कोटी
  6. थकबाकी- १७ कोटी

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर