कोल्हापूर : सर डोनाल्ड ब्रॅडमन,पाकिस्तानचा सईद अन्वर यांची बॅट, सचिन तेंडूलकरांचा टि शर्ट तर सौरभ गांगुली, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, मार्क वॉ, डेसमंड, हेन्स यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या क्रिकेट मधील विविध वस्तू अशा अनोख्या ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी ’ क्रि केट साहित्याच्या प्रदर्शन पाहण्यासासाठी सोमवारी दुसर्या दिवशी मोठी गर्दी केली होती.शाहू स्मारक भवन येथे पुण्याचे उद्योजक रोहन पाटे व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्लेड्स आॅफ ग्लोरी संग्रहातील जगातील नामांकित क्रिकेट वीरांच्या साहित्याचे प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर मध्ये प्रथमच सुरु आहे.
क्रिकेट विश्वबाबात असलेले कुतूहल आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी सकाळ पासूनच शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती. प्रदर्शनात सोमवारी महापौर स्वाती यवलुजे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर उपस्थित होते.
सेल्फीसाठी गर्दी...प्रदर्शनात सचिन तेंडुलकर आणि विरट कोहलीच्या बँटसोबत सेल्फी काढण्याचा वेगळी व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोफ अनेकांना आवरता आला नाही. दिवसभर याठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
सर डॉन ब्रँडमन यांच्या बँटचे कुतूहलप्रदर्शनातील सर डॉन ब्रँडमन यांनी त्यांच्या १९४८ च्या कारकीर्द मध्ये वापरलेली बँट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे अनेक जुने जाणकार लोक या बँटचा इतिहास लहान मुले अथवा तरुणांना सांगताना या ठिकाणी दिसत होते.
यासह या ठिकाणी १९७५ ते २०१५ मध्ये झालेल्या ११ विश्वकप विजेत्या संघांनी व संघनायकांनी स्वाक्षरी केलेल्या बॅट, आॅस्ट्रेलियन फलंदाज निल हार्वे याच्या स्वाक्षरीसह बॅट, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, मुथय्या मुरलीधरन यांनी विक्रमी खेळी करताना वापरलेली पॅड्स, जर्सी (टी-शर्ट), टी-२० विश्वविजेता भारत, पाकिस्तान व इंग्लंड संघांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅट्स, सौरभ गांगुली, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, युवराज, पीटरसन, मार्क वॉ, बोर्डर, डेसमंड, हेन्स, गॉर्डन ग्रिनिज यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या क्रिकेटविषयक वस्तू, माल्कम मार्शलची टोपी, रिचर्डची जर्सी-स्वेटर, डेव्हिड बूनची जर्सी, जावेद मियॉँदादची स्वाक्षरीसह बॅट, राहुल द्रविड, रिचर्डस, कॅलीस, पॉँटिंग यांच्या स्वाक्षरीसह वापरलेल्या क्रिकेटोपयोगी वस्तू, पाकिस्तानचा सईद अन्वर यांनी भारताविरुद्ध चेन्नई येथे १९४ धावा केलेली बॅट. बॉल, स्मृतिचिन्ह यासह अन्य वस्तूंचा समावेश.