अमर पाटीलकळंबा : बसस्थानकाच्या गैरसोयीचा फटका प्रवाशांना बसतो. शहरात वाहतूककोंडीची मोठी समस्या बनत असल्याने विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त संभाजीनगर बसस्थानकाचे आधुनिक बसपोर्ट बनवणार असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. ९ कोटी ८० लाखांच्या निधीतून सुरू असलेल्या संभाजीनगर बसपोर्टच्या कामाची पाहणी आमदार पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.नवीन बसपोर्टचा काही भाग व्यापारासाठी देण्यासाठी प्रयत्न करणार असून भविष्यात आणखी निधी उपलब्ध करून आगार अत्याधुनिक स्वरूपाचे बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिग्विजय मगदूम यांनी बसस्थानक परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी केली.यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, मधुकर रामाने, आदिल फरास, सचिन चव्हाण, दिग्विजय मगदूम, दुर्वास कदम, सुयोग मगदूम, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, विभागीय अभियंता मनोज लिंग्रास, यांसह आगार व्यवस्थापक उत्तम पाटील, स्थानक प्रमुख सागर पाटील यांसह नागरिक उपस्थित होते.सत्तांतराचा फटका बसू देणार नाहीशेंडापार्क येथे शंभर कोटींची प्रशासकीय इमारत, खंडपीठ, क्रीडासंकुल ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध असून सत्तांतराचा फटका विकासकामांना बसू देणार नसल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.'सीबीएस'वरील ताण कमी करणारवाढत्या गाड्यांच्या संख्येने शहरात वाहतुकीची कोंडी होत असून सीबीएसवर मोठा ताण पडत आहे. उपनगरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सीबीएस बसस्थानकातून जाणाऱ्या बहुतांश एसटी गाड्या भविष्यात संभाजीनगर येथून सोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूर: संभाजीनगर बसस्थानकाचे आधुनिक बसपोर्ट बनवणार : आमदार सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 1:55 PM