शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

कोल्हापूर-सांगलीचे इसवी सनपूर्व रोमशी संबंध उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:19 AM

कोल्हापूर : रोमच्या प्राचीन सांस्कृतिक राजवटीतील महत्त्वाची चिन्हे असलेली चक्रव्यूह चिन्हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आढळल्याने इसवी सनपूर्व रोमशी ...

कोल्हापूर : रोमच्या प्राचीन सांस्कृतिक राजवटीतील महत्त्वाची चिन्हे असलेली चक्रव्यूह चिन्हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आढळल्याने इसवी सनपूर्व रोमशी असलेल्या व्यापारी संबंधांवर सांगली जिल्ह्यातील कुरळपचे युवा संशोधक सचिन भगवान पाटील यांनी उजेड टाकला आहे. त्यांनी लिहिलेल्या पुरातत्वीय संशोधन शोधनिबंधाला शुक्रवारी लंडनच्या केर्डोरिया या मासिकाच्या पहिल्या पानावर स्थान मिळाले आहे.

सांगली जिल्ह्यातील सचिन पाटील कुरळपकर हे गेल्या पाच वर्षांपासून ‘चक्रव्यूह व त्याच्या भारतातील पुरातन रचना’, तसेच ‘या संरचनेचा महाराष्ट्रातील अवशेष व इसवी सनपूर्व इंडो-रोमन व्यापारी संबंध’ या अनुषंगाने अभ्यास करीत आहेत. त्यांना सांगली जिल्ह्यातील ढेंगेवाडी, ऐतवडे बुद्रुक आणि वशी येथे तीन (ता. वाळवा), तसेच मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे एक, अशा चार पाऊलखुणा आढळल्या. अशाच खुणा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असल्याचा त्यांचा विश्वास असून, येणाऱ्या काळात यावर शोधकार्य पूर्ण करण्यात येणार आहे.

रोमन-पश्चिम महाराष्ट्र व्यापाराचा नवा संदर्भ

या नव्या संशोधनामुळे रोमन आणि पश्चिम महाराष्ट्रात व्यापारासाठी येत होते, हा नवा संदर्भ उजेडात आला असून, हा इतिहास नव्याने लिहिला जाणार आहे. ते सातवाहन काळात समुद्रमार्गे भारतात आले आणि त्यांनी पठारी प्रदेशात येताना दिशादर्शक म्हणून ही दगडी चक्रव्यूह रचना मांडल्याच्या भूमिकेला या संशोधनामुळे बळ मिळाले आहे. प्रो. सांकरिया यांच्या कोल्हापुरातील ब्रह्मपुरीतील उत्खननातील संदर्भानुसार रोमन समुद्रदेवता पोसायडननंतर या नव्या संशोधनाला बळकटी मिळाली आहे, असे मत इतिहास अभ्यासक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी व्यक्त केले आहे. यामुळे सांगली, कोल्हापूर परिसराशी रोमचे असलेले तीन हजार वर्षांपूर्वीचे संबंध जगापुढे आले आहेत.

चौकट

जगभरातील संशोधकांमध्ये स्थान

लंडनच्या केर्डोरिया हे "CAERDROIA" The Journal of Maze and Labyrinth हे चक्रव्यूह संशोधन प्रकाशित करणारे आंतरराष्ट्रीय मासिक असून, भारतासह पोर्तुगीज, अमेरिकन संशोधन यंदाचे या मासिकाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. सचिन पाटील यांच्या या शोधनिबंधाला जगातील निवडक ९ संशोधनामध्ये प्रथम स्थान देऊन प्रकाशित करण्यात आले आहे. आज हे इ-मॅगझिन जगातील अभ्यासकांसाठी उपलब्ध केले असून, नजीकच्या काळातच याची प्रिंटेड कॉपी बाजारात उपलब्ध होणार आहे.

कोट

इसवी सनपूर्व इंडो-रोमन व्यापारी संबंध यामुळे प्रकाशात आले आहेत. रोमन समुद्रमार्गे भारतात आले आणि कोकणातून नागपूरपर्यंतच्या पठारी भागात व्यापारासाठी पसरले. त्यामुळे त्यांनी दिशादर्शक म्हणून ही चक्रव्यूहाची रचना केली, याला या संशोधनामुळे बळ मिळाले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी अशा जुन्या पाऊलखुणा नष्ट करू नयेत.

- डॉ. पी. डी. साबळे, विभागप्रमुख, पुरातत्व शाखा

डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट अँड डिमंड युनिव्हर्सिटी, येरवडा, पुणे

---------------------

फोटो : 16072021-kol-Sachin Patil

फोटो ओळी : सचिन पाटील, कुरळपकर

फोटो : 16072021-kol-Labyrinth walwa.jpg

फोटो ओळी : वाळवा तालुक्यात आढळलेले चक्रव्यूह.

फोटो : 16072021-kol-Labyrinth kavthemahnakal

फोटो ओळी : कवठेमहांकाळ तालुक्यात आढळलेले चक्रव्यूह.

160721\16kol_4_16072021_5.jpg~160721\16kol_5_16072021_5.jpg

फोटो : 16072021-kol-Labyrinth walwa.jpgफोटो ओळी : वाळवा तालुक्यात आढळलेले चक्रव्यूह~फोटो : 16072021-kol-Labyrinth kavthemahnakalफोटो ओळी : कवठेमहंकाळ तालुक्यात आढळलेले चक्रव्यूह.