कोल्हापूर : अभाविपच्या माध्यमातून देशभरात विद्यार्थीनींना भयमुक्त बनविण्यासाठी तसेच कुठल्याही परिस्थितीत लढा देण्यासाठी स्व- संरक्षणाच्या प्रशिक्षणाचे एक राष्ट्रव्यापी मिशन साहसीच्या रुपात प्रारंभ झाले आहे. पूर्ण देशभरात ५ लाख पेक्षा जास्त विद्यार्थीनीना आपल्या क्षमतांचे विभिन्न स्थानांवर प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी यांनी विद्यार्थीनीना महिला विषयातील कायद्यांचे मार्दर्शन केले. तसेच प्राचार्य प्रशांत पट्टलवार सरांनी विद्यार्थीनीना प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेऊन काम करण्यास प्रोत्साहन दिले. साधना वैराळे यांनी कोणावर अवलंबून राहू नये तसेच निडर बनून जगावे व कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले.५ दिवसांचे प्रशिक्षण मास्टर अमोल भोसले तसेच त्यांचे सहकारी सुरज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले. प्रत्यक्ष आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या वस्तूंचा (उदा. पेन, आय कार्ड , हेअर पिन, स्कार्प) स्व- संरक्षणासाठी उपयोग कसा करायचा तसेच कोणतीही वस्तू उपलब्ध नसताना जर अतिप्रसंग ओढावला तर त्यातून आपली सुटका कशी करायची याचे प्रशिक्षण दिले. ६७ विद्यार्थीनीनी प्रशिक्षण घेतले.