शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

कोल्हापूर : किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:25 PM

वारंवार लेखी देऊनही बैठकांना अनुपस्थित राहणारे, पंचायत राज समितीच्या दौऱ्यावेळीही गायब असणारे प्रभारी शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. त्यांच्या कारभाराचा पाढाच सदस्यांनी वाचला.

ठळक मुद्देकिरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशीजिल्हा परिषदेच्या सभेत निर्णय : कार्यालयात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा

कोल्हापूर : वारंवार लेखी देऊनही बैठकांना अनुपस्थित राहणारे, पंचायत राज समितीच्या दौऱ्यावेळीही गायब असणारे प्रभारी शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. त्यांच्या कारभाराचा पाढाच सदस्यांनी वाचला.लोहार यांच्या कार्यपद्धतीबाबत आणि माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणाबद्दल यावेळी सभागृहात जोरदार चर्चा झाली.

सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी आज का उपस्थित नाहीत, अशी विचारणा करत या विषयाला तोंड फोडले. ते स्थायीच्या बैठकीला नव्हते, सर्वसाधारण बैठकीला नाहीत. पाच, सहा महिन्यांपूर्वी पत्र देऊनही त्यांच्याकडून माहिती मिळाली नाही, असा आरोप निंबाळकर यांनी केला.प्रवीण यादव म्हणाले, नोटीसही न देता कारवाई करून आयुष्यातून उठवण्याची धमकी लोहार यांनी ज्यांना दिली होती. ते सभागृहाबाहेर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याकडे काय मागणी केली याचीही माहिती घ्या.ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले म्हणाले, लोहार यांनी आल्यापासून किती शिक्षकांना मान्यता दिली, त्यांच्या शाळा, नावे आणि पत्ते मी मागितले होते. अजूनही ही माहिती मिळाली नाही. पंचायत राज समितीवेळीही ते हजर नव्हते. चार आमदार त्यांच्यावर हक्कभंग दाखल करणार आहेत. त्यांच्याबाबतीत आत्ताच जो काही निर्णय घेणार तो घ्या. समिती स्थापन करा, चौकशी करा. अन्यथा त्यांना कार्यालयात येऊ देणार नाही आणि सभागृहही चालू देणार नाही, असा इशाराच इंगवले यांनी दिला.

यानंतर सदस्य आणि अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी नोटीस देऊन त्यांना संधी देण्याची विनंती केली होती; मात्र ती अमान्य करण्यात आली. राहुल आवाडे यांच्यासह अन्य सदस्यांनीही यावेळी कारवाईची मागणी केली.

चहापेक्षा किटली गरममाध्यमिक शिक्षण विभागातील कारभार म्हणजे ‘चहापेक्षा किटली गरम’अशी परिस्थिती असल्याचा आरोप राजवर्धन निंबाळकर यांनी यावेळी केला. पदाधिकाऱ्यांनीही बोलावल्यानंतरही बैठकीसाठी लोहार येत नसल्याचे सांगत सदस्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचाही पंचनामा केला. 

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाkolhapurकोल्हापूर