शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

कोल्हापूर : पोस्टाचा सर्व्हर अद्याप संथच, गेले तीन दिवस संपुर्ण यंत्रणा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 3:13 PM

चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने गेले तीन दिवस पोस्टाची संपुर्ण यंत्रणा कोलमडली आहे. शनिवारी सकाळ पासून कोल्हापूरातील सर्व्हर पुर्ववत झाला असला तरी त्याला गती नसल्याने पोस्टाची कामे अद्याप संथ गतीनेच सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देचेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन पोस्टाची कामे अद्याप संथ गतीनेच कोल्हापूरातील सर्व्हर पुर्ववत झाला तरी गती नाही

कोल्हापूर : चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने गेले तीन दिवस पोस्टाची संपुर्ण यंत्रणा कोलमडली आहे. शनिवारी सकाळ पासून कोल्हापूरातील सर्व्हर पुर्ववत झाला असला तरी त्याला गती नसल्याने पोस्टाची कामे अद्याप संथ गतीनेच सुरू असल्याचे चित्र आहे.

चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने देशभरातील पोस्ट कार्यालयातील कामकाज गुरूवार सकाळ पासून ठप्प झाले. सर्व्हर शिवाय कर्मचाऱ्यांना काहीच काम करता येत नसल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत.

पोस्टात बचत खात्यांसह विविध व्यवहार केले जातात. पण गुरूवार पासून सर्व्हर डाऊन झाल्याने सगळे कामच ठप्प झाले आहे. शुक्रवारी सकाळी दहा -पंधरा मिनिटे तेवढाच सर्व्हर सुरू झाला, पण नंतर पुन्हा बंद झाल्याने कामकाज होऊ शकले नाही.

शनिवारी सकाळ पासून रमणमळा येथील मुख्यकार्यालयात संथ गतीने का असेना पण सर्व्हर सुरू झाल्याने कामकाज थोडे सुरळीत झाले. पण ‘आरडी’चे काम ठप्पच राहिले. इतर कार्यालयातील सर्व्हर डाऊनच राहिल्याचे सांगण्यात आले.‘एटीएम’ ग्राहकांना दिलासागेले तीन दिवस पोस्टातून पैसे भरणे, काढणे बंद असल्याने ग्राहकांची कोंडी झाली होती. पण ज्यांच्याकडे पोस्टाचे एटीएम आहे, त्यांना किमान दहा हजार रूपयापर्यंतची रक्कम मिळत आहे. पोस्टाची जिल्ह्यात तीन-चार एटीएम सेंटर असली तरी त्यांचे कार्ड कोणत्याही एटीएम मशीनला चालत असल्याने या ग्राहकांना त्याची फारशी झळ बसत नाही. 

टॅग्स :Postal Groundपोस्टल ग्राऊंडkolhapurकोल्हापूरChennaiचेन्नई