कोल्हापूर : बहूरंगी व बहूढंगी कलाकार शाहीर राजू राऊत याना राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने "डि.लिट्."ने सन्मानित केले.
गेली चाळिस वर्षे ऐतिहासिक, तसेच कला व संस्कृतीचा वैभवी वारसा जतन करण्यासाठी धडपडणाऱ्या आणि त्याबरोबरच पुरोगामी सामाजिक व पर्यावरणीय चळवळींना बळ देण्यासाठी लेखणी व डफ हाती घेतलेल्या शाहीर राजू राऊत याना रविवारी म्हणजे राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने "डि.लिट्."ने सन्मानित केले.
राऊत हे बहूरंगी व बहूढंगी कलाकार असले तरी केवळ शिवस्तुती आणि सामाजिक हितासाठीच शाहिरी व डफ वापरायचा या बाण्याने शाहिरी जपण्याच्या अव्यभिचारी निष्ठेचाही यामुळे सन्मान झाला आहे.
पत्रकात म्हटले आहे की,"वरळी सी फेस येथील सिल्व्हर ओक या वास्तूत देशा परदेशातील महनीय व्यक्तिंच्या ऊपस्थितीत झालेल्या समारंभात स्वतः डॉ. डी.वाय.पाटील यांच्या हस्ते शाहीर राऊत याना डि.लिट्. प्रदान करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. शिरीष पाटील, माँरिशसचे ऊच्चायुक्त जगदीश्वर गोस्क, तसेच राऊत यांच्या पत्नी सुनीता व कन्या चैत्रा आणि सहकाऱ्यांचीही ऊपस्थिती होती.
एक वेगळाच योगायोग
एकवीस वर्षांपूर्वी राजर्षी शाहू जयंतीला शाहीर राऊत यांनी कानपूरमधील शाहू मेळा "निमित्ताने शिव-शाहू पोवाडा पथक सुरु केले होते आणि राजर्षी शाहू पुण्यतिथीदिवशी त्यांना डि.लिट्.चा सन्मान लाभला हा एक वेगळाच योगायोग आहे.अर्थात असा सन्मान शाहीर राऊत याना लाभला याला त्यांनी अथकपणे शाहिरी,चित्रकला,शिल्पकला,छायाचित्रण, तसेच इतिहास व सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी दिलेले योगदा जसे कारणीभूत आहे , त्याचप्रमाणे डॉ. डी.वाय.पाटील यांनी दाखविलेली गुणग्राहकताही कारणीभूत आहे."