कोल्हापूर : तीन पत्त्यांच्या जुगारअड्ड्यावर सोमवारी (दि. २३) रात्री शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून व्यवस्थापकासह १३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून चार मोटारसायकल, १४ मोबाईल, दूरचित्रवाणी (टी.व्ही.), इलेक्ट्रीक शेगडी, फॅन, सतरंजी असा सुमारे चार लाख ३८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.व्हीनस कॉर्नर ते विल्सन पूल रोडवरील तीन मजली इमारतीमध्ये हा जुगार चालला होता. या जागेचा मालक कच्छी (रा. जवाहरनगर, कोल्हापूर, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) नावाची व्यक्ती असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, तीनमजली इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर हा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकला. याप्रकरणी व्यवस्थापक संशयित संजय शंकर पाटील (वय ४८, रा. शाहूपुरी, पाचवी गल्ली), कृष्णा गणपती पाटील (४२, रा. कोतोली, ता. पन्हाळा), संजय अंतू सावंत (४०, रा. विक्रमनगर,जुन्या व्यायामशाळेजवळ), शाहीद शकील सय्यद (३२, रा. घिसाड गल्ली, सोमवार पेठ), नीलेश बाबूराव गवळी (४०, रा. शिंगणापूर), सुनील महादेव पाटील (३५), विजय आण्णासो थोरवत (३२, दोघे रा. हेर्ले, ता. हातकणंगले), जमीर बाबू महात (३२, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), लोकदास शंकरन नायर (५०, रा. टाकाळा), युवराज नारायण कांबळे (४०, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर), रंगराव बाळासो लोखंडे (४७, रुकडी, ता. हातकणंगले), महादेव सुनील जगताप (२२) व गोविंद अंकुश कांबळे (२१, दोघे रा. राजेंद्रनगर) यांना अटक करण्यात आली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.