शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

हाऊसफुल्ल गर्दीने कोल्हापुरात फुटबॉल हंगामाचा किक-ऑफ, शिवाजी तरुण मंडळाची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 1:13 PM

पहिल्याच सामन्यात खेळाडूंमध्ये हाणामारी  

कोल्हापूर : शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगमधील शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ या तुल्यबळ संघांतील लढत पाहण्यासाठी फुटबॉल शौकिन, समर्थकांनी छत्रपती शाहू स्टेडियममध्ये हाऊसफुल्ल गर्दी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावरील गर्दीने पहिल्यांदाच फुटबॉल हंगामाचा किक-ऑफ झाला. त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. चुरशीच्या पहिल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने विजयी सलामी दिली. हंगामाच्या पहिल्याच दिवशी तिकीट विक्रीतून १ लाख ४८ हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली.या स्पर्धेचे उद्घाटन शाहू छत्रपती यांच्या, तर चषकाचे अनावरण जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सदस्य मालोजीराजे, मधुरिमाराजे, उद्योजक तेज घाटगे, केएसएचे माणिक मंडलिक, नितीन जाधव, दीपक शेळके, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, दिग्विजय राजेभोसले, यशराजराजे छत्रपती, आदी उपस्थित होते. तुतारीचा निनाद, हलगी-खैताळ या पारंपरिक वाद्यांच्या गजराने उद्घाटन कार्यक्रमातील उत्साह वाढविला. बालकल्याण संकुलातील विद्यार्थ्यांनी ७५ फुगे हवेत सोडून शाहू छत्रपती यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ‘शिवाजी’ आणि ‘खंडोबा’ संघांतील २२ खेळाडूंनी प्रत्येक एक फुटबॉलला प्रेक्षक गॅलरीच्या दिशेने किक मारून उपस्थितांना अनोखी भेट दिली. चुरशीच्या सामन्यात  ‘शिवाजी’ची विजयी सलामीचढाया-प्रतिचढाया, लक्षवेधक बचाव अशा चुरशीने रंगलेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर ३-१ अशा गोलने मात करत विजयी सलामी दिली. स्टेन्ली ईजी याने नोंदविलेल्या ४ गोलच्या जोरावर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संध्यामठ तरुण मंडळावर एकतर्फी मात केली.‘शिवाजी’ आणि ‘खंडोबा’ या दोन्ही संघांनी सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक खेळीत करत गोल नोंदवून आघाडी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यात ‘खंडोबा’ची बचावफळी भेदण्यात ‘शिवाजी’च्या आघाडीच्या फळीतील खेळाडू यशस्वी ठरले. त्यातील संकेत साळोखे याने विक्रम शिंदे याच्या पासवर सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला चेंडूला गोलजाळीत धाडून संघाचे खाते उघडले. त्याची परतफेड करण्यासाठी ‘खंडोबा’च्या अबुबखर हसन, दिग्विजय आसनेकर यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही. पूर्वार्धात १-० अशा गोलने ‘शिवाजी’ची आघाडी राहिली. उत्तरार्धात गोल नोंदवून सामन्यात आघाडी घेण्यासाठी ‘शिवाजी’, तर गोलची परतफेड करण्यासाठी ‘खंडोबा’ने खेळ केला. त्यात ‘शिवाजी’च्या परदेशी खेळाडू कोफी कुसाई याने संदेश कासार याच्या पासवर सामन्याच्या ६० व्या मिनिटाला गोल करून संघाला २-० अशा गोलने आघाडी मिळवून दिली.खेळाडूंमध्ये हाणामारी  त्यानंतर तीन ते चार मिनिटांनी अचानकपणे मैदानात या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये हाणामारी सुरू झाली. पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापकांनी मध्यस्थी करत वाद मिटविला आणि सामना पुन्हा सुरू झाला. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेतलेल्या ‘खंडोबा’च्या अबूबकर हसन या परदेशी खेळाडूने सामन्याच्या ८२ व्या मिनिटाला चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवित संघावरील आघाडी एका गोलने कमी केली. सामन्याच्या ८८ व्या मिनिटाला ‘शिवाजी’च्या रोहित जाधव याने मोठ्या डीच्या बाहेरून गोल नोंदविला. अखेर ‘शिवाजी’च्या संघाने ३-१ अशी आघाडी घेत विजय मिळविला. ‘शिवाजी’च्या संदेश कासार, रोहन आडनाईक, गोलरक्षक मयूरेश चौगुले यांनी, तर ‘खंडोबा’च्या संकेत मेढे, प्रभू पोवार यांनी चांगला खेळ केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल