शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कोल्हापूर : शालिनी सिनेटोनची जागा आता ‘हेरिटेज’च्या यादीत, आयुक्तांची अधिसूचना : कारभाऱ्यांचे मनसुबे उधळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:45 AM

कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या रम्य परिसरात ४७ एकरांत वसलेल्या ऐतिहासिक शालिनी सिनेटोन या स्टुडिओची जागा प्लॉट पाडून विक्री करण्याचा घाट संबंधितांकडून घातला गेला होता; पण ही जागा आता कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या (हेरिटेज) यादीत समावेश करण्याबाबतची अधिसूचना मंगळवारी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी काढल्याने अनेक कारभाºयांचे मनसुबे उधळले.

ठळक मुद्देशालिनी सिनेटोनची जागा आता ‘हेरिटेज’च्या यादीततीस दिवसांत हरकती, आयुक्तांची अधिसूचनाआयुक्तांना अधिकार, कारभाऱ्यांचे मनसुबे उधळले

कोल्हापूर : कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या रम्य परिसरात ४७ एकरांत वसलेल्या ऐतिहासिक शालिनी सिनेटोन या स्टुडिओची जागा प्लॉट पाडून विक्री करण्याचा घाट संबंधितांकडून घातला गेला होता; पण ही जागा आता कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या (हेरिटेज) यादीत समावेश करण्याबाबतची अधिसूचना मंगळवारी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी काढल्याने अनेक कारभाऱ्यांचे मनसुबे उधळले.कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या रम्य परिसरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोन या स्टुडिओची जागा प्लॉट पाडून विक्री करण्याचा घाट संबंधितांकडून घातला होता. त्याबाबत महापालिकेतील काही कारभाºयांनी मोठी सुपारी घेतल्याची चर्चा होती.

मराठी चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ यांनी आंदोलन करून ही जागा स्टुडिओसाठीच राखीव ठेवावी यासाठी आंदोलन केले. त्याच्या दबावापोटी संबंधितांनी १३ हजार ८०० चौरस मीटर व २० हजार चौरस मीटर असे दोन भूखंड राखीव ठेवले.

या भूखंडावर स्टुडिओचे आरक्षण कायम करावे म्हणून महापालिका प्रशासनाने महासभेसमोर प्रशासकीय प्रस्ताव ठेवला होता. तथापि, हा प्रस्ताव महासभेने एकमताने नामंजूर केला; पण त्यावेळी हा प्रस्ताव काय आहे, हे खुद्द नगरसेवकांनाच माहीत नव्हते.कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने शासन निर्णयानुसार २०१५ मध्ये कोल्हापूर शहरासाठी हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी स्थापन केली आहे.

तिच्या डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या बैठकीत शालिनी सिनेटोनच्या जागेचा सिनेटोनखेरीज अन्य वापर करण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. जून २०१७ च्या बैठकीत हेरिटेज स्थळाच्या यादीत या जागेचा समावेश करण्याबाबत शासनाला कळविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीची बैठक गेल्या मंगळवारी (दि. ९) रोजी होऊन शालिनी सिनेटोनचे ए वॉर्ड रि.स.नं. ११०४ पैकी भूखंड क्र. ५चे क्षेत्र ६३१०.६० चौ.मी., भूखंड क्र. ६ चे क्षेत्र १६१०१.६० चौ. मी. व अ‍ॅमिनिटी स्पेस क्षेत्र ६४८१.०० चौ. मी. या क्षेत्रफळाची जागा ऐतिहासिक परिसर म्हणून ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत (हेरिटेज) समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे या जागेचा ऐतिहासिक परिसर म्हणून कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या ग्रेड-३ यादीत समावेश करण्याबाबतची अधिसूचना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली. या अधिसूचनेमुळे अनेक कारभाऱ्यांचे मनसुबे उधळले आहेत.तीस दिवसांत हरकतीशालिनी सिनेटोनच्या जागेचा ‘हेरिटेज’मध्ये समावेश करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली. या अधिसूचनेवर ३० दिवसांत हरकती, सूचना मागविण्यात येत आहेत. याबाबतच्या हरकती व सूचना सहायक संचालक, नगररचना, नगररचना विभाग, कोल्हापूर महानगरपालिका बागल मार्केट, दुसरा मजला, राजारामपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर या कार्यालयाकडे सादर कराव्यात, असे आवाहन केले आहे.आयुक्तांना अधिकारकोल्हापूर शहरासाठी शासनाने ‘ड’ वर्ग विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली मंजूर केली आहे. ती २९ सप्टेंबर २०१६ रोजी लागू केली आहे. त्यानुसार हेरिटेज कमिटीच्या सल्ल्याने व नियमानुसार प्रक्रिया राबवून ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीत वाढ अथवा सुधारणा करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर