कोल्हापूर : गेले आठ-दहा दिवस अवजड वाहनांसाठी बंद केलेला शिवाजी पूल बुधवारी दुपारी अखेर वहातूकीसाठी खुला करण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जोरदार पावसाने सर्वच नद्यांना पूर आला. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर सर्व प्रकारच्या वहातूकीसाठी शिवाजी पूल बंद ठेवण्यात आला होता. सुरक्षितेच्या कारणासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला.
त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाण्याची पातळी कमी होत गेल्यानंतर दुचाकी वाहनांना वाहतूकीस परवानगी दिली होती. पण अजवड व चार चाकी वाहनांची वहातूक बंदच होती. गेले दोन दिवस पावसाची उघडझाप सुरू असल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे.