तानाजी पोवार ।कोल्हापूर : महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे. कोट्यवधींचा निधी उपलब्ध आहे, भूसंपादन ९८ टक्के झाले तरीही एकमेकांच्या प्रतिष्ठेपायी सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. मार्गावर पाच वर्षांत १८२च्या वर बळी गेले आहेत.
दक्षिण व उत्तर भारताला जोडण्यासाठी मुंबई ते बंगलोर राष्टÑीय महामार्ग हा महत्त्वाचा दुवा आहे. या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सन २००५ मध्ये पूर्ण झाले. महामार्गावरील वाहतुकीचा ताण पाहता रस्ता सहा पदरी करण्याचा निर्णय झाला. संपूर्ण मार्ग सहा पदरीकरण करण्याचे काम ‘एमएसआरडीसी’ने सुरू केले. ते सन २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान होते. मुंबई ते पुणे तसेच कागल ते बंगलोर सहा पदरीकरणाचे काम पूर्ण झाले. सन २०१४ मध्ये ‘रालोआ’ सरकार सत्तेवर आल्यावर पुणे ते सातारा रस्ता सहा पदरीकरणाचे काम राष्टÑीय महामार्ग विभागाने केले; पण या रस्त्याच्या दर्जाची तुलना ही कागल ते बंगलोर या रस्त्यांच्या कामाशी झाली. त्यातून पुणे ते सातारा रस्ता सहा पदरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याचे समोर आले. त्यामुळे सातारा ते कोल्हापूर हा १३३ कि.मी.चा रस्ता करताना वादाचे मुद्दे उपस्थित होऊन रस्ता रेंगाळला आहे.
आता हा रखडलेला रस्ता सहा पदरीकरण करायचा कोणी, हा वादाचा मुद्दा बनला आहे. या वादात रस्त्याच्या निविदेला १२ वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या या कामास मुहूर्त लागणार तरी कधी, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.बास्केट ब्रीज अडकलासातारा ते कागल १३३ किलोमीटर लांबी रस्ता सहा पदरीकरण कामाच्या निविदेला सुमारे १२ वेळा मुदतवाढ दिली; पण तांत्रिक कारणांमुळे निविदा खुली करण्याची प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलावी लागली. निविदा-पे-निविदा प्रक्रियेत कोल्हापूरचे प्रवेशद्वार संबोधला जाणारा १२६० मीटर लांबीचा १७५ कोटी रुपये खर्चाचा ‘बास्केट ब्रीज’ अडकला आहे. 3टोल वसुली मात्र जोमातएमएसआरडीसी आणि एनएचएआय या दोघांच्या करारानुसार या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही ‘एमएसआरडीसी’ची आहे; पण रस्त्यांची कामे अपूर्ण, सुविधा अगर सेवारस्ता नसतानाही ‘एमएसआरडीसी’ने टोल जमा करून सर्वसामान्यांच्या पैशांची लूट सुरू केली आहे.
सेवा रस्ते, सुविधांची वानवासातारा ते कागल या रस्त्याच्या कडेला औद्योगिक क्षेत्र, हॉटेल्स पेट्रोलपंप, शेतीक्षेत्र आदी व्यवसायांसह लहान-मोठी गावे आहेत. या मार्गाला सेवारस्ते नसल्याने मुख्य मार्गावर दुचाकी वाहतुकीसह, बैलगाड्या, ट्रॅक्टर, रिक्षा आदीं वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.