शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

कोल्हापूर : सर्वसामान्यांसह धावपटूंना सहा जानेवारीची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:29 AM

लोकमत समूहाच्या दुसऱ्या पर्वातील महामॅरेथॉनबद्दल कोल्हापूरकरांसह राज्य व परराज्यांतील व्यावसायिक व हौशी धावपटूंसह सर्वसामान्यांनाही मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. खऱ्या अर्थाने महामॅरेथॉनची नोंदणी २० डिसेंबर २०१८ ला संपली. कोल्हापूरकरांसह राज्यभरातून वाढता प्रतिसाद व मागणीमुळे ही मुदत पुन्हा वाढविली. त्यानुसार सहभाग नोंदणीसाठी उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर कार्यालयासह जिल्ह्यातील इचलकरंजी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी नोंदणी करण्याकरीता रीघ लागली आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांसह धावपटूंना सहा जानेवारीची उत्सुकतालोकमत महामॅरेथॉन; सहभाग नोंदणीसाठी कार्यालयात रीघ

कोल्हापूर : लोकमत समूहाच्या दुसऱ्या पर्वातील महामॅरेथॉनबद्दल कोल्हापूरकरांसह राज्य व परराज्यांतील व्यावसायिक व हौशी धावपटूंसह सर्वसामान्यांनाही मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. खऱ्या अर्थाने महामॅरेथॉनची नोंदणी २० डिसेंबर २०१८ ला संपली. कोल्हापूरकरांसह राज्यभरातून वाढता प्रतिसाद व मागणीमुळे ही मुदत पुन्हा वाढविली. त्यानुसार सहभाग नोंदणीसाठी उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर कार्यालयासह जिल्ह्यातील इचलकरंजी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी नोंदणी करण्याकरीता रीघ लागली आहे.‘आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत ‘लोकमत’ने कोल्हापूरमध्ये ६ जानेवारीला आयोजित केलेल्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथान पॉवर्ड बाय माणिकचंद आॅक्सिरिच’ स्पर्धेच्या नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत आहे. स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, नावनोंदणीसाठी आता काही दिवसच उरले आहेत. महाराष्ट्रासह परराज्यांतील व्यावसायिक धावपटू, प्रौढ धावपटू, नागरिक, महिला व उदयोन्मुख खेळाडूंनीही नोंदणी केली आहे. हा ओघ अजूनही सुरूच आहे.‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धा ६ जानेवारीला कोल्हापुरातील पोलीस ग्राऊंड येथे होणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मनुष्याचे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे शरीरावर अनिष्ट परिणाम होऊ लागले आहेत. सर्वांनी सुदृढ राहण्यासाठी ‘लोकमत’ने मोठे पाऊल उचलले असून, महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे. त्याद्वारे व्यायामाचे व फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

मीही १० किलोमीटर स्पर्धेत स्पर्धक म्हणून धावणार आहे. तुम्हीही मागे न राहता या स्पर्धेत सहभागी व्हावे. व्यायाम न केल्याने मनुष्याला अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. म्हणून शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी महामॅरेथॉन आवश्यक आहे, ही बाब ओळखून महामॅरेथॉनचे राज्यभरातील पाच शहरांत आयोजन केले आहे. त्यात कोल्हापुरातही ही मॅरेथॉन होत आहे. त्यामुळे यात सहभागी होण्याची नामी संधी कोल्हापूरकरांनी सोडू नये.- खासदार धनंजय महाडिकतंदुरुस्त राहण्यासाठी रोज धावारोजच्या जीवनात काम करीत असताना व्यक्तीने रोज फिरले पाहिजे, चालले किंवा धावले पाहिजे. आजच्या युगात आरोग्य चांगले तर सर्व काही आपण साध्य करू शकतो. त्यासाठी कुटुंबातील लहान, तरुण, वृद्ध, आदी सर्वांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज पहाटे धावले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. त्यासाठी आळस करून चालणार नाही. ‘लोकमत’ने आपणा सर्वांना या निमित्ताने धावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मी व माझे कुटुंबीय या ‘महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होत आहोत. तुम्हीदेखील सहभागी व्हा.- सतीश माने : गृह पोलीस उपअधीक्षककऱ्हाडातील ‘फिटस्टॉप’चे सदस्यही सहभागीउत्कृष्ट व्यवस्थापनाचा नमुना असलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ची लोकप्रियता पाहून आयर्नमॅन क्षितीज सारंग बेलापुरे यांचे कऱ्हाडातील पहिले फंक्शनल ट्रेनिंग व क्रॉस फिट ट्रेनिंगचे फिटनेस स्टुडिओ असलेले ‘फिटस्टॉप’चे सर्व सदस्यही सहा जानेवारीला होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होणार आहेत. या ‘फिटस्टॉप’मध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम घेतला जातो. गु्रप वर्कआऊटबरोबरच पर्सनल ट्रेनिंगही दिले जाते. कार्डियाक अ‍ॅन्शुअरन्स, स्ट्रेन्थ ट्रेनिंग, फ्लेक्झिबिलिटी, एजिलिटी वाढविण्यासाठीचे व्यायाम, आॅनलाईन वर्कआऊट येथे दिला जातो. यापूर्वी फिटस्टॉपच्या सदस्य मुंबई, गोवा, पुणे मॅरेथॉन, महाबळेश्वर इनड्युरॅथलॉन, दिल्ली मॅरेथॉन, बंगलोर मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.दहा किलोमीटरची रन पूर्ण करणार दिव्यांग ‘संतोष ’राक्षी (ता.पन्हाळा) येथील दिव्यांग धावपटू संतोष रांजगणे हा ६ जानेवारीला होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये नियमित दहा किलोमीटर रनमध्ये धावणार आहे. तो व्हीलचेअर घेऊन ही रन पूर्ण करणार आहे. त्याने यापूर्वी चेन्नई येथे कोटकतर्फे २१ कि.मी. व्हीलचेअर मॅरेथॉनमध्ये २ तास १३ मिनिटे, तर बेळगाव येथील मॅरेथॉन ५ कि.मी. ३६ मिनिटात, आधार पुनावाला क्लीन सिटी मॅरेथॉनमध्ये ५ कि.मी अंतर ३१ मिनिटांत पूर्ण करीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासह पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्येही सहावा क्रमांक पटकाविला. यासह तो महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट टीममध्ये क्रिकेटपटू म्हणूनही सहभागी होत आहे. यातही त्याने उत्तराखंड येथे झालेल्या आयडब्ल्यूपीएल स्पर्धेतही राज्य संघाचे विजेतेपद पटकाविले. त्यातही संतोषने चांगली कामगिरी केली.आंतरराष्ट्रीय कराटेपटू ‘राजीव’ही सहभागीयेथील शांतिनिकेतन स्कूलचा विद्यार्थी असलेला आंतरराष्ट्रीय कराटेपटू राजीव अनिल करोशी हाही महामॅरेथॉनच्या १० कि.मी. रनमध्ये सहभागी होणार आहे. त्याने यापूर्वी शिमोगा येथे झालेल्या आंतररराष्ट्रीय पीपल्स आॅलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, तर सकाई नॅशनलमध्ये सुवर्ण, आदी ठिकाणी झालेल्या विविध कराटे स्पर्धेत यश मिळविले आहे. त्याची नुकतीच श्रीलंका व नेपाळ येथे होणाºया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.नावनोंदणीसाठी संपर्कया महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.

सहा लाखांची बक्षिसेया वर्षातील महामॅरेथॉनला नाशिक येथून सुरुवात झाली आहे. त्यात नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर १६ डिसेंबरला औरंगाबाद येथे महामॅरेथॉन उदंड प्रतिसादात पार पडली. आता कोल्हापुरात ६ जानेवारीला तिसरी महामॅरेथॉन होणार आहे. त्यानंतर नागपूर येथे ३ फेबु्रवारी आणि १७ फेबु्रवारी २०१९ ला पुणे येथे महामॅरेथॉन होत आहे. कोल्हापुरात होणारी ही महामॅरेथॉन २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन, १० कि.मी. पॉवर रन, ५ किलोमीटर फन, तर ३ किलोमीटर फॅमिली रन होणार आहे. त्यातील विजेत्यांना पदक आणि सहा लाख रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathonलोकमत कोल्हापूर महामॅरेथॉनkolhapurकोल्हापूर