शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

कोल्हापूर : ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ मोहिमेस सुरुवात, विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 5:26 PM

वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झाली.

ठळक मुद्दे‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ मोहिमेस सुरुवातविविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

कोल्हापूर : वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी वाहतुकीच्या नियमांचे फलक घेऊन वाहनधारकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेत वाहतूक पोलिसांसह स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेतला. ‘शपथ घेऊ, वाहतुकीचे नियम पाळू’, असे आवाहन वाहनधारकांना केले.वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते. वाहनधारकांनी स्वयंशिस्त पाळावी. प्रथम रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून द्यावा. यासह वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिसांसह स्वयंसेवी संस्थांकडून प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे. यात युनिक आॅटोमोबाईल, नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे, कोडोली येथील गनिमी कावा ग्रुपचे तरुण आणि पोलिसांनी यात सहभाग घेतला.यावेळी पोलीस अधीक्षक मोहिते म्हणाले, ‘वाहतुकीच्या शिस्तीसाठी पोलिसांकडून नियमित प्रयत्न सुरू असतात. मात्र, वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्याने नियमांचे पालन होत नाही. आपल्याला वाहतुकीची शिस्त हवी असेल, तर नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे.

आपल्यामुळे कोणाची अडवणूक होऊ नये, याची दक्षता प्रत्येकाने घेतली तर, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. पोलिसांसह काही स्वयंसेवी संस्थादेखील यासाठी रस्त्यावर उतरत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. महापौर स्वाती यवलुजे यांनी प्रबोधन मोहिमेचे स्वागत करून शहरातील मार्गदर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, स्पीडब्रेकर, ट्रॅफिक सिग्नल सुसज्ज ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्न करील, असे आश्वासन दिले.झेब्रा क्रॉसिंगवर थांबू नये, सीट बेल्टचा वापर करावा, रस्त्याची डावी बाजू रिकामी ठेवावी, रुग्णवाहिकांना पुढे जाण्यास जागा द्यावी, ट्रिपलसीट प्रवास करू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे असे सांगत, ‘शपथ घेऊ, वाहतुकीचे नियम पाळू,’ असे आवाहन केले. यानिमित्त पोलीस व्हॅनमधून वाहतूक नियमांची चित्रफीतही दाखविण्यात आली.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, नगरसेवक संजय मोहिते, युनिक आॅटोमोबाईलचे सुधर्म वाझे, वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, प्रा. किरण पाटील, बिपीन मिरजकर, अभय देशपांडे, राहुल देसाई, ‘गनिमी कावा ग्रुप’चे संतोष हुजरे, अशोक पाटील, अमोल कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध चौकांत पथनाट्ये नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे हे ‘केवायफोरएस’ या संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी (दि. १७) पासून वाहतुकीच्या नियमांची माहिती वाहनधारकांपर्यंत पथनाट्याद्वारे पोहोचविणार आहेत. शहरातील विविध चौकांत पथनाट्ये सादर करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, याकरिता प्रबोधन केले जाणार आहे. विशेष म्हणजे यात अंध विद्यार्थीही सहभाग घेणार आहेत.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूरHealth Tipsहेल्थ टिप्स