कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. यंदा स्पर्धेसाठी तब्बल २४ संघांनी सहभाग नोंदवला असून, त्यात एक संघ वगळता सर्व नाटके कोल्हापूर शहर जिल्ह्यातील संस्थांच्या वतीने सादर केली जाणार आहेत.संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रोज सायंकाळी सात वाजता स्पर्धेतील नाटके सादर होतील. यंदा स्पर्धेला नाट्य संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नव्या-जुन्या संहितांची जवळपास २४ नाटके यात सादर होणार आहेत. दरवर्षी सांगलीसह कोकण विभागातील काही संघ यात सहभागी होत असतात. यंदा मात्र कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, जयसिंगपूर, आजरा, चंदगड, कागल या तालुक्यांमधूनही संघांनी नोंदणी केली आहे.स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-तारीख नाटक संस्था१५ नोव्हेंबर कॅलीगुला अभिरुची, कपीलतीर्थ, कोल्हापूर१६ शिगारेठ भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, नागाळा पार्क, कोल्हापूर.१७ वरचा मजला रिकामा डॉ. के. गोईलकर चॅरिटेबल ट्रस्ट (इचलकरंजी)१८ जत्रेतलं जायंट व्हील गायन समाज देवल क्लब, खासबाग, कोल्हापूर१९ भर चौकात गांधी पुतळ्यासमोर हृदयस्पर्शी हौशी सांस्कृतिक व्यासपीठ, रविवार पेठ, कोल्हापूर२० अक्कड बक्कड कृषिदूत कृषिविज्ञान, आजरा, कोल्हापूर२१ तरुण तर्क म्हातारे अर्क नाट्य शुभांगी, जयसिंगपूर२२ महंत नवनाट्य मंडळ, आजरा महाविद्यालय, आजरा२३ दो बजनिए निष्पाप कला निकेतन सेवा संस्था, इचलकरंजी२४ ऱ्हासपर्व परिवर्तन कला फौंडेशन, मिरजकर तिकटी, कोल्हापूर२६ अवध्य प्रज्ञान कला अकादमी, ता. पन्हाळा, कोल्हापूर२७ महादेव भाई प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र, प्रतिभा नगर, कोल्हापूर२८ मडवॉक रंगयात्रा नाट्यसंस्था, इचलकरंजी३ डिसेंबर अखेरचा सवाल राणी अहिल्याबाई वाचन मंदिर, सेनापती कापशी, कागल४ लगीनघाई रुद्रांश अकॅडमी, प्रज्ञापुरी, कोल्हापूर५ हॅलो मी चेअरमन बोलतो संस्कार बहुद्देशिय सामाजिक संस्था, भुयेवाडी, ता. करवीर६ युगारंभ १६४५ शिवम नाट्य संस्था, जवाहरनगर, कोल्हापूर७ गोष्ट लाखाची शिवतेज तरुण मंडळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर८ क्रॉस कनेक्शन श्री जयोस्तुते युवक मित्र मंडळ, कोल्हापूर९ अशुद्ध बीजापोटी श्री साई नाट्यधारा मंडळ, चंदगड, कोल्हापूर१० नूर मोहम्मद साठे श्री सरस्वती वाचनालय (शहापूर-बेळगांव)११ नंगी आवाजे श्री तुकाराम माळी तालीम मंडळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर१२ ती फुलराणी सुगुन नाट्य कला संस्था, पाचगाव, करवीर१३ एका गर्भाशयाची गोष्ट यशोधरा पंचशील थिएटर अकॅडमी, कळंबा, कोल्हापूर