कोल्हापूर : खून, खूनाचा प्रयत्न, गुंडगिरी, खंडणी, टगेगिरीच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील ‘एसटी’ गँगचा म्होरक्या गुंड स्वप्निल तहसीलदार याला रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी शिताफीने अटक केली. त्याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले असताना तो शहरात वावर होता.संघटीत गुन्हेगारीच्या जोरावर मुंबई, कराड, सांगली, मिरज, कर्नाटकातील गुन्हेगारांची टोळी बनवून खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, सरकारी कामात अडथळा आनणे आदी गंभीर गुन्हे तहसीलदारवर दाखल आहेत. त्याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. परंतू, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर तो शहरात वावरत होता.
याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत, इकबाल महात, सुनिल कवळेकर, शिवाजी खोराटे, हणमंत ढवळे, रमेश् डोईफोडे, आनंद निगडे, अमित सर्जे, अमर वासुदेव, प्रदीप पवार, स्मिता माने यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार या पथकाने शाहू मार्केट यार्ड येथील वरद रोडलाईन्स ट्रान्सोर्ट कंपनीच्या कार्यालयाचे दूसऱ्या मजल्यावर छापा टाकून तहसीलदारच्या मुसक्या आवळल्या.