कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व शेंडापार्कातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील ठेका घेतलेल्या एका कंपनीच्या सफाई कामगारांनी शुक्रवारी (दि. ७) सुमारे तासभर काम बंद केले. पण ; याचा परिणाम आरोग्यसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.
वैद्यकिय महाविद्यालय प्रशासनाने सफाई कामगारांचे बिले लवकरच काढतो असे आश्वासन दिले. त्यामुळे पुर्ववत सफाई कामगारांनी काम सुरु केले.सीपीआरमधील काही विभागात तर शेंडापार्कातील वैद्यकिय महाविद्यालयात साफसफाईचे काम स्क्वेअर फुटावर देण्यात आले आहे.
गेल्या चार महिन्यापासून महाविद्यालय प्रशासनाने बिल न दिल्यामुळे सुमारे २०० सफाई कामगारांनी तासभर काम बंद केले. सफाई कामगार केसपेपर विभाग,रक्त तपासणी आदी विभागात हे कामगार काम करतात.
वरिष्ठ कार्यालयाकडून पैसे न आल्याने चार महिन्याचे बिल थकीत आहे. ते लवकर देऊ.-डॉ. सुधीर नणंदकर, अधिष्ठाता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर.