शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

कोल्हापूर : सुधीर फडके म्हणजे चालतं, बोलतं संगीत :  पद्माकर पाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:20 AM

अतिशय खडतर परिस्थितीत व कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जात सुधीर फडकेंनी गायनात आणि संगीतात चांगले काम केले. सुधीर फडके म्हणजे चालतं, बोलतं संगीत होतं, असे मत पद्माकर पाठक यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देसुधीर फडके म्हणजे चालतं, बोलतं संगीत :  पद्माकर पाठककरवीरनगर वाचन मंदिर आयोजित वि. स. खांडेकर व्याख्यानमाला

कोल्हापूर : अतिशय खडतर परिस्थितीत व कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जात सुधीर फडकेंनी गायनात आणि संगीतात चांगले काम केले. सुधीर फडके म्हणजे चालतं, बोलतं संगीत होतं, असे मत पद्माकर पाठक यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.करवीरनगर वाचन मंदिर आयोजित पद्मभूषण वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत ‘स्वरतीर्थ सुधीर फडके तथा बाबूजी’ या विषयावर ने बोलत होते. उपाध्यक्ष नंदकुमार मराठे अध्यक्षस्थानी होते.यावेळी पद्माकर पाठक म्हणाले, लहानपणापासूनच त्यांना गायन व संगीतात आवड होती. त्यांचे वडील विनायक वामन फडके यांचे कोल्हापूरकरांबरोबर जिव्हाळ्याचे संबध होते. त्यानंतर मामाच्या ओळखीने ते मुंबईला गेले; पण वयाच्या १४ व्या वर्षी ते पुन्हा कोल्हापुरात आले. कोल्हापुरातील कवी न. ना. देशपांडे यांच्याबरोबर ओळखीतून १९३४ ला त्यांनी गणेशोत्सवात काम केले. त्यांचे मूळ नाव राम फडके होय.चांगले गाणी म्हणायची असेल तर चांगली गीते ऐकली पाहिजेत. हे ओळखून त्याकाळी ते महाद्वार रोडवरील हॉटेल सेंट्रलच्या बाहेर उभे राहून गीतांचा आस्वाद घेत. त्या गीतांची जागा काय, हरकती काय, यांचा ते अभ्यास करीत. त्याप्रमाणे ते गाणी म्हणण्याचा प्रयत्न करीत. तसेच ते दर गुरुवारी अंबाबाई मंदिरातील रामाच्या पाराजवळ जात. तेथे भक्तांची गीते ऐकायची.

याच दरम्यान ते बालमित्र बाळ गाडगीळ यांच्या संपर्कात आले व त्यांनी कोल्हापुरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे काम सुरू केले. या काळात त्यांनी मित्र परिवार तयार केला. समाजातील दु:खद प्रसंगी एखाद्याला मदत करायची असे त्यांनी ठरविले. त्यानुसार मित्रांसोबत काम करू लागले. गायनाकडे ते उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहत होते.

कोल्हापुरातून ते मुंबई येथे गेले. तेथे पोटासाठी त्यांनी बॅण्ड वाजविण्याचे, घरोघरी जाऊन चहा पावडर विक्री करायचे; पण त्यांना काहीजण याचे पैसे द्यायचे नाहीत. भाजी विक्रीचा व्यवसाय सुरूकेला. मात्र, प्रकृती कारणामुळे त्यांनी हा व्यवसाय सोडून दिला. या अडचणीच्या काळात त्यांना अभिनेत्री दुर्गा खोटे भेटल्या. त्यांची भेट झाली; परंती काहीनी त्यांच्याबद्दल अपप्रचार केला असल्याने तेथेही त्यांना संधी मिळाली नाही आणि ते करिअरसाठी मुंबईहून नाशिकला गेले. कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रशांत वेल्हाळ यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :musicसंगीतkolhapurकोल्हापूर