कोल्हापूर : घाऊक बाजारात साखरेच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून, दर प्रतिकिलो ३४ रुपये राहिला आहे. भाजीपाला, कडधान्य बाजार तुलनेत स्थिर राहिले आहे. फळबाजारात हापूस आंब्याची आवक कमी होऊन अननस, पेरूंची रेलचेल अधिक दिसत आहे.साखरेच्या दरात कमालीची घसरण होऊन घाऊक बाजार २७०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आल्याने किरकोळ दरही कमी झाले होते; पण केंद्र सरकारने बफर स्टॉकसह इतर घेतलेल्या निर्णयाने साखरेचे दर कमालीचे वधारले असून घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३०५० पासून ३२०० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे.
पावसाळा सुरू झाल्याने कडधान्याचा बाजार एकदम थंड पडला आहे. त्यामुळे तूरडाळ ६५, हरभराडाळ ५० ते ६०, मटकी ७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. ज्वारीची मागणी अंतिम टप्प्यात असून चांगली ज्वारी २५ ते ३० रुपये किलोपर्यंत आहे. शाबू, सरकी तेलासह इतर वस्तूंचे दर कायम राहिले आहेत.पावसामुळे स्थानिकचा भाजीपाला कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम दरावर दिसतो. कोबी, वांगी, गवार या प्रमुख भाज्यांच्या दरांत थोडी वाढ दिसते; पण इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. टोमॅटोची आवक बऱ्यापैकी असल्याने घाऊक बाजारात सरासरी सात रुपये दर आहे.
मेथी, पोकळा, पालकाची आवक कमी असल्याने दर १० रुपये प्रतिपेंढी आहे. कोथिंबिरीची आवक घटल्याने दर शेकडा १४०० रुपये आहे. फळबाजारावर पावसाचा परिणाम झाला असून, गेले दोन-अडीच महिने पिवळाधमक दिसणारा फळांचा बाजार कमी झाला आहे.
कर्नाटकातून आंब्यांची आवक सुरू असली तरी आणखी चार ते पाच दिवसच ती सुरू राहील. तोतापुरी आंब्यांची आवक सध्या जोरात आहे. अननस, पेरूंची रेलचेल सुरू असून, एका अननसचा दर २० ते ३० रुपये राहिला आहे.
बटाटा-लसूण स्थिरगेल्या आठवड्यापेक्षा बटाटा व लसणाच्या दरांत फारशी चढउतार दिसत नाही; पण पावसामुळे कांद्याची आवक काहीशी कमी झाल्याने दरात थोडी वाढ झालेली आहे. घाऊक बाजारात किलो मागे दीड रुपयाची वाढ झाली.आंब्याचे दर असे-आंबा आवक सरासरी दर रुपयांतहापूस ८० पेटी ४५०हापूस ४२० बॉक्स २२५लालबाग ३५० बॉक्स ५०मद्रास हापूस ५०० बॉक्स १२०पायरी १५० बॉक्स ६०
घाऊक बाजारात प्रमुख भाज्यांचे दर प्रतिकिलो असे-कोबी- ८, वांगी- ३५, टोमॅटो- ११, ढबू- ३०, गवार- २७, कारली- ४०, भेंडी- ३०, वरणा- ४५, दोडका- ४०.