शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

कोल्हापूर : ‘एफआरपी’ थकविणाऱ्यां कारखान्यांवर कारवाई करा, शिवसेनेची साखर सह संचालकांकडे मागणी : डिसेंबरअखेर ३३५ कोटी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 5:52 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांकडे डिसेंबर २०१७ अखेर ३३५ कोटी रुपये थकीत एफआरपी असून, संबंधित कारखान्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सोमवारी केली.

ठळक मुद्दे‘एफआरपी’ थकविणाऱ्यां कारखान्यांवर कारवाई कराशिवसेनेची साखर सह संचालकांकडे मागणी डिसेंबरअखेर ३३५ कोटी प्रलंबित

कोल्हापूर : जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांकडे डिसेंबर २०१७ अखेर ३३५ कोटी रुपये थकीत एफआरपी असून, संबंधित कारखान्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सोमवारी केली.शुगर केन कंट्रोल आॅर्डर १९९६ प्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस गाळप केल्यानंतर १४ दिवसांत उसाचे पैसे त्याच्या खात्यावर वर्ग केले पाहिजेत, अन्यथा संबंधित कारखान्यांवर फौजदारी दाखल करता येते. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले.

डिसेंबर २०१७ अखेर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ४१ लाख ८२ हजार ८८ लाख टनांचे गाळप केले आहे. गाळप केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे ११३९ कोटी सहा लाख रुपये शेतकऱ्यांना देय रक्कम आहे. आतापर्यंत ८०४ कोटी ४८ लाख ८२ हजार रुपये कारखान्यांनी दिले आहेत; पण अद्याप ३३५ कोटी रुपये देय आहे.

महागडी खते, वीजदरामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भांडवलदारांच्या व्यापातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

शेतकऱ्यांनी आता बघायचे कोणाकडे? असा सवाल करत आपणही साखर कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला. शेतकऱ्यांच्या देय रकमेबाबत दोन दिवसांत साखर आयुक्त पुणे येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, अशी मागणीही देवणे यांनी केली.दर पंधरवड्याला एफआरपीचा आढावा कार्यालयामार्फत घेण्यात येतो. ज्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत, त्याबाबतचा अहवाल साखर आयुक्तांकडे पाठविला जातो. त्यानुसार आयुक्त कार्यालयाकडून संबंधित कारखान्यांची सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी सांगितले.

शिष्टमंडळात उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, राजू यादव, धनाजी यादव, प्रवीण पालव, भरत चव्हाण, बाजीराव पाटील, अमित नेर्लेकर, महेश नलवडे, चंद्रकांत भोसले, कुमार पाटील, आदी उपस्थित होते.

डिसेंबर २०१७ अखेर देय एफआरपी :कारखान्याचे नाव            एकूण एफआरपी             दिलेली एफआरपी                        थकीतभोगावती                           ४१ कोटी ६८ लाख              २१ कोटी ३७ लाख               २० कोटी ३१ लाखराजाराम                            ४० कोटी ५२ लाख               ११ कोटी ५० लाख              २९ कोटी १लाखशाहू                                   ६३ कोटी ७२ लाख               ३७ कोटी ६ लाख               २६ कोटी ६५ लाखबिद्री                                 ५० कोटी ६० लाख                 २८ कोटी १९ लाख            २२ कोटी ४० लाखआप्पासाहेब नलवडे           ३२ कोटी ३२ लाख                २४ कोटी ९९ लाख              ७ कोटी ३२ लाखजवाहर                             १२० कोटी ९० लाख               ७३ कोट ९७ लाख             ४६ कोटी ९२ लाखमंडलिक                             ४३ कोटी ५४ लाख                २८ कोटी ७० लाख           १४ कोटी ८३ लाखकुंभी                                    ५६ कोटी ४२ लाख              ३२ कोटी ६१ लाख            २३ कोटी ८१ लाखवारणा                                   ८४ कोटी १२ लाख             १४ कोटी ६२ लाख           ६९ कोटी ५० लाखगायकवाड                           ३० कोटी ३५ लाख                ४ कोटी ३८ लाख            २५ कोटी ९६ लाखघोरपडे                                 ७५ कोटी ७ लाख                  ४९ कोटी ९३ लाख          २५ कोटी १३ लाख 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना