शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

कोल्हापुरात हजारामागे ९२५ मुली, ‘मुलगी वाचवा’ कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 5:49 AM

देशभर स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून ओळख मिळविलेल्या कोल्हापुरातच आता कुणी तरी इथल्या मुली वाचवा हो,

नसिम सनदीकोल्हापूर : देशभर स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून ओळख मिळविलेल्या कोल्हापुरातच आता कुणी तरी इथल्या मुली वाचवा हो, अशी हाक देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर पाच वर्षांच्या नीचांकावर पोहोचला असून, लिंगगुणोत्तर प्रमाण १००० मुलांमागे ९२५ मुली असे झाले आहे.कोल्हापूरसारख्या सधन जिल्ह्यातच मुलींचे प्रमाण घटत चालल्याने मुलगी वाचवा अभियानाला ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दरवर्षी लिंगगुणोत्तर प्रमाण जाहीर करतो. डिसेंबर २०१९ मधील वार्षिक आकडेवारीनुसार आजच्या घडीला १००० मुलांमागे ९२५ मुली असे प्रमाण झाले आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण ९३३ इतके होते. गेल्या पाच वर्षांत सातत्याने मुलींचा जन्मदर वाढत असतानाच या वर्षी मात्र त्याला अचानक ब्रेक लागला आहे. ही धोक्याची घंटा समजली जात आहे.करवीरमध्ये सर्वांत कमी मुलीजिल्ह्यातील सर्वांत सधन व शहरानजीकचा तालुका असलेल्या करवीरमध्येच मुलींचे प्रमाण सर्वांत कमी आहे. ८९५ मुली असे प्रमाण आहे. याउलट डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या दुर्गम अशा चंदगड, गगनबावडा तालुक्यांत मुलींचा जन्मदर सर्वांत चांगला आहे.चंदगडमध्ये एक हजार मुलांमागे ९८१ इतके प्रमाण दिसते. गगनबावडा तालुक्यात ९७८ आहे. हातकणंगले ९४९, शाहूवाडी ९४७, आजरा ९३६, गडहिंग्लज ९३३, कागल ९२०, भुदरगड ९१९, पन्हाळा ९०७, शिरोळ ९०५, राधानगरी ९०१ असे प्रमाण यावर्षी दिसत आहे.