शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

कोल्हापूर : खासदार, आमदारांच्या नाकर्तेपणामुळेच सुळकूड गावावर ही वेळ : संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:55 PM

खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच गावावर ही वेळ आल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देखासदार, आमदारांच्या नाकर्तेपणामुळेच सुळकूड गावावर ही वेळ : संजय पवारराज्य शासनाने हे गाव दत्तक घ्यावे: देवणे

कोल्हापूर : पायाभूत व प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने सुळकूड (ता. कागल) या गावाने कर्नाटकात जाण्याचा घेतलेला निर्णय हा खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच गावावर ही वेळ आल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला; तर राज्य शासनाने हे गाव दत्तक घेऊन सर्व योजना येथे राबवाव्यात, अशी मागणी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.संजय पवार म्हणाले, या गावाने घेतलेला हा निर्णय धक्कादायक असून येथील खासदार व आमदारांचे हे अपयश आहे. विकासकामांचे फोटोसेशन करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या या लोकांनी नेमका कोणता विकास केला हा प्रश्न उपस्थित होत आहे. आदर्श ग्राम योजनेतील गावे निवडताना खासदार व आमदारांनी मते किती आहेत याचाच विचार केला आहे. त्यामुळे कर्तृत्व दाखवायचे असेल तर अशी गावे त्यांनी दत्तक घेऊन आपले कर्तृत्व दाखवावे.विजय देवणे म्हणाले, या गावाला पायाभूत सुविधा मिळत नाहीत म्हणून त्याने कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. संयुक्त महाराष्टÑ चळवळीत अनेक हुतात्मे झाले आहेत. त्यामुळे हा ठराव रद्द करावा यासाठी शिवसेनेने सरपंच लक्ष्मीकांत पाटील यांना विनंतीपत्र दिले आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संभाजी भोकरे, विद्या गिरी, दिनकर जाधव, दीनानाथ चौगुले, दुर्गेश लिंग्रस, आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी सुळकूडला भेट द्यावीपालकमंत्री व सीमाभागाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठी माणसाच्या हितासाठी या गावाला भेट द्यावी व राज्य शासनाने हे गाव दत्तक घेऊन येथील विकासकामांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी देवणे यांनी केली.

सुळकूडप्रश्नी मंगळवारी बैठकगावाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय बैठक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकार्‍याना निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकार्‍यानी राधानगरी-कागल प्रांताधिकार्‍याना बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील राधानगरी प्रांताधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती देवणे यांनी दिली.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर