शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात कोल्हापूर टॉप टेनमध्ये, चंदगड आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 3:56 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष स्थापना वर्धापनदिनाचे औचित्य साधून सुरू केलेल्या अभिप्राय अभियानात कोल्हापूरने राज्यात पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये येण्याचा मान मिळवला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात कोल्हापूर टॉप टेनमध्ये, चंदगड आघाडीवर१० मतदारसंघातील २९ हजार जणांनी नोंदवले अभिप्राय

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष स्थापना वर्धापनदिनाचे औचित्य साधून सुरू केलेल्या अभिप्राय अभियानात कोल्हापूरने राज्यात पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये येण्याचा मान मिळवला आहे. १० ते ३० जून या २० दिवसांच्या काळात जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतून २९ हजार जणांनी अभिप्राय नोंदवले असून, यात चंदगड प्रथम क्रमांकावर आहे. सर्वांत कमी नोंदणी इचलकरंजीत झाली आहे.

यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या प्रमाणावर साजरा करता येत नसल्याने डिजिटल माध्यमातून कार्यकर्त्यांशी जोडून राहण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीने १० जून ते ३० जून या कालावधीत अभिप्राय अभियान राबवले. यात राज्यातील सात लाख ६१ हजारांनी सहभाग नोंदवला. ऑनलाईन स्वरूपातच कार्यकर्त्यांकडून माहिती भरून घेण्यात आली. यात पक्षवाढीच्या अनुषंगाने सूचना, प्रलंबित विकासकामे, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या नेते, पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा अशा २४ प्रश्नांची विचारणा करण्यात आली होती.या अभियानाची सांगता मंगळवारी (दि. ३० जून) झाली. यानंतर आलेले अभिप्राय जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम १० जिल्ह्यांत आला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे अभिप्राय यशस्वी केले गेले.तालुका नोंदवलेले अभिप्राय

  • चंदगड : ६५६३
  • राधानगरी : ४७१७
  • शिरोळ : ४३८८
  • शाहूवाडी : ३३७९
  • कोल्हापूर उत्तर : २१०५
  • कागल : १७२०
  • कोल्हापूर दक्षिण : १७०९
  • हातकणंगले : १४१५
  • करवीर : १३६०
  • इचलकरंजी : १०७४

एका तालुक्याऐवजी प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघनिहाय मते जाणून घेण्यात आली आहेत; त्यामुळे याला सर्वसमावेशकता आली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच कोल्हापूर टॉप टेनमध्ये आले आहे.- अनिल साळोखे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर