समीर देशपांडे ।कोल्हापूर : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्ह्याने पहिल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. केवळ तपासणीच नव्हे तर नंतरची संदर्भीय सेवा आणि शस्त्रक्रियांमध्येही कोल्हापूर अव्वल ठरले असून, जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कामाची ही एकप्रकारे पोहोचपावतीच आहे. नवीन आर्थिक वर्षातील सहा महिन्यांच्या या कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याला १०० पैकी ८५ गुण मिळाले आहेत.
हा कार्यक्रम १ मे २०१३ पासून राज्यात सुरू आहे. याअंतर्गत ० ते १८ वयोगटांतील अंगणवाडी ते कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते. शासनमान्य, अनुदानित शाळा, आश्रमशाळा, अनाथालय, अपंग, गतिमंद मुलांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचीही तपासणी करण्यात येते. अंगणवाडीतील मुला-मुलींची वर्षातून दोनवेळा तर अन्य विद्यार्थ्यांची एकवेळा तपासणी करण्यात येते.
२५००० विद्यार्थ्यांमागे एक पथक आणि एका पथकामध्ये एक पुरुष, एक महिला वैद्यकीय अधिकारी, दोन कर्मचाºयांचा समावेश असतो. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी अधिकारी डॉ. विलास देशमुख यांनी संपूर्ण जिल्ह्याचे या तपासणी मोहिमेचे नियोजन केले. तपासणीच्या आधी एक महिना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना याबाबतचा दौरा दिला जातो. ठरलेल्या दिवशी त्या-त्या शाळेत तपासणी मोहीम राबविली जाते.
केवळ तपासणीच नव्हे तर हृदयशस्त्रक्रिया, इतर अन्य शस्त्रक्रिया यामध्येही कोल्हापूर जिल्ह्याचे काम उल्लेखनीय ठरले आहे. अंगणवाडीतील ५३ विद्यार्थ्यांची हृदयशस्त्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यातील ४७, तर शालेय विद्यार्थ्यांच्या आवश्यक अशा १० विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हार्निया, इतर गाठी, वाकडे ओठ, वाकडे पाय यासारख्या ५४९ शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यातील ५४५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.एकूण तपासलेले टक्केवारीअंगणवाडी संख्या ४३६२ ४३२४ ९९.१३बालके (० ते ६ वय) २,५७,७९६ २,५२,९०० ९८.१०शाळांची संख्या २९७३ १४७७ ४९.६८विद्यार्थी (६ ते १८) ४,४६,८०५ २,१७,०१८ ४८.५७संदर्भ सेवा व उपचार संदर्भित केलेले संदर्भ सेवा मिळालेले प्रत्यक्ष उपचार केलेलेअंगणवाडी विद्यार्थी २११९ २११८ १८५४१शाळा विद्यार्थी २५९६ २५२२ २८०६७
सुरुवातीपासूनच या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आमच्या सर्व वैद्यकीय अधिकाºयांनी आणि कर्मचाºयांनी परिश्रमपूर्वक हे काम केले आहे. त्यामुळेच पहिल्या सहा महिन्यांत राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर येण्याचा मान कोल्हापूरला मिळाला. याच पद्धतीने या पुढेही कामास बांधील आहोत.- डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर