शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

कोल्हापूर : पर्यटकांना ‘आडवाटेवरच कोल्हापूर’चे मोफत दर्शन, १३ एप्रिल पासून दोन बसेस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 4:12 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटन स्थळे व त्यांचा इतिहास लोकासमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत ‘आडवाटेवरच कोल्हापूर’ दर्शनाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे, हिल रायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. १३ एप्रिल पासून शुक्रवार व शनिवारी दोन-दोन बसेस सुटणार असून यामध्ये ५० टक्के स्थाथिक पर्यटकांना तर उर्वरित बाहेरील पर्यटकांना राखीव राहील असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपर्यटकांना ‘आडवाटेवरच कोल्हापूर’चे मोफत दर्शनचंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ‘हिल रायडर्स’चा पुढाकार १३ एप्रिल पासून दोन बसेस धावणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटन स्थळे व त्यांचा इतिहास लोकासमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत ‘आडवाटेवरच कोल्हापूर’ दर्शनाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे, हिल रायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. १३ एप्रिल पासून शुक्रवार व शनिवारी दोन-दोन बसेस सुटणार असून यामध्ये ५० टक्के स्थाथिक पर्यटकांना तर उर्वरित बाहेरील पर्यटकांना राखीव राहील असेही त्यांनी सांगितले.हिल रायडर्स फौंडेशन, एक्टीव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सहलीचे आयोजन केले असून हॉटेल मालक संघ, विविध संघटना, बचत गटांचे सहकार्य लाभल्याचे सांगत पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड म्हणाले, कोल्हापूरात पर्यटक आला की जोतिबा, अंबाबाई, नृसिंहवाडी येथे पर्यंत मर्यादीत राहतो. पण कोल्हापूरच्या दुर्गम डोंगरात अनेक छुपी पर्यटनस्थळे आहेत. प्राचीन गुहा, गड, शिल्पे, युध्दभूमी, मंदीरे, जंगले यांचे दर्शन पर्यटकांना व्हावे, पर्यटनस्थळे सक्षम होतीलच पण तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी पालकमंत्री पाटील यांनी ही संकल्पना पुढे आणली.

कोल्हापूर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिग्लज तालुक्यातील बारा हून अधिक प्रक्षेनिय स्थळे दाखवली जाणार आहे. दोन्ही बसमध्ये तीन मुले व तीन मुली गाईड म्हणून राहणार आहे.निसर्ग मित्र अनिल चौगुले म्हणाले, सहलीचा मार्ग निसर्गरम्य आहे. शिवडाव येथील देवराई व तेथील लोकांचे नाते वेगळे आहे. येथे पंचमहाभुतांचा अनुभव येतो, इतका सुंदर परिसर आहे. अशी अनेक ठिकाणे आपण या माध्यमातून पाहू शकणार आहे.असा असणार सहलीचा मार्ग-दसरा चौक-पोहाळे (ता. पन्हाळा) लेणी-शिवाजीची विहीर-पावनखिंड, येळवण जुगाई मंदीर-अणुस्कुरा जंगलात पदभ्रंमती-तिसंगी (जेवण)-पळसंबा शिल्प- सांगशी-बोरबेट जंगलातून चक्रेश्वरवाडी-काळम्मावाडक्ष (रात्रीची विश्रांती)-कडगाव, पाटगाव मौनी महाराज मठाचे दर्शन-शिवडाव येथील देवराई, मेघोली-शिरसंग येथील वटवृक्ष-नेसरी-कोल्हापूर.

अस्सल ग्रामीण नाष्टा-जेवणचहा-नाष्टा व दोन्ही वेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे. तेथील अस्सल पारंपारिक जेवण स्थानिक बचत गट देणार आहेत. त्यामध्ये नाचणीची भाकरी, डांगर, पिठल्याचा आश्वाद घेता येणार आहे.

आॅनलाईन बुकींगदोन दिवसाची मुक्कामी सहल, निवास, भोजन व्यवस्था मोफत आहे. आॅनलाईन बुकींग करून यामध्ये सहभागी होता येणार असून बुकींग नुसारच पर्यटकांना संधी दिली जाणार आहे. एका सहलीत शंभर व्यक्ती सहभागी होऊ शकतात. बुकींगसाठी नोंदणी करायची आहे. त्याशिवाय याबाबत अधिक माहितीसाठी समित एॅडव्हेन्टचर्स, पर्ल हॉटेल जवळ, कोल्हापूर. येथे संपर्क साधावा.

आडवाटेवरची वैशिष्टये-राष्ट्रीय अभयारण्याचा अनुभन६०० पैकी १०० किलो मीटरचा जंगलातून प्रवास३ किलो मीटरचा जंगलातून पदभ्रमंतीप्राचीन गुहा, शिलालेख, वास्तू मंदीरे असा पुरातत्व ठेवारोमांचकारी युध्दभूमीचा परिसराला भेटसह्याद्रीच्या पर्वतरांगेतून भव्य पठार, खोल दऱ्या व समृध्द जंगाचा नजराणा.‘रानमेवा’ चाखण्याची संधीचक्रेश्वरवाडी येथे ३६० डिग्री मधून आकाशाचे निरीक्षण

असे आहे नियोजन-वार              तारीख                   कोणासाठीशुक्रवार           १३ एप्रिल               फक्त पुरूषशनिवार           १४ एप्रिल              फक्त महिलाशुक्रवार            २० एप्रिल              फक्त पुरूषशनिवार            २१ एप्रिल             फक्त महिलाशुक्रवार          २७ एप्रिल             फॅमिली/ सहकुटूंबशनिवार           २८ एप्रिल             फक्त पुरूषशकु्रवार          ४ मे                      फक्त पुरूषशनिवार            ५ मे                     फक्त महिलाशुक्रवार            ११ मे                   फक्त पुरूषशनिवार            १२ मे                 फक्त महिलाशुक्रवार             १८ मे                फॅमिली/सहकुटूंबशनिवार             १९ मे                 फक्त पुरूषशुक्रवार              २५ मे                फक्त महिलाशनिवार             २६ मे              फॅमिली/ सहकुटूंब 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन