कोल्हापूर : गांधी मैदान-शिवाजी पेठ व कदमवाडी येथे मटका घेणाऱ्या दोघा एजंटांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित दस्तगीर नूरमहंमद कुडचे (वय ४६, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर), प्रकाश मारुती गोसावी (३९, रा. महालक्ष्मी नगर, कदमवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
प्रकाश गोसावी (आरोपी)
त्यांच्याकडून मोबाईल, मटक्याचे साहित्य व रोकड असा सुमारे दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बुकीमालक राजू बन्ने (शिवाजी पेठ), अभिजित यादव (जवाहरनगर) हे फरार आहेत. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.एकाही बुकीमालकाला अटक नाहीगेल्या दोन महिन्यांत डझनपेक्षा जास्त मटका एजंटांना पोलिसांनी अटक केली. अड्डा बुकीमालक कागदोपत्री फरार दाखविले आहेत. ते उजळ माथ्याने शहरात वावरत असताना पोलीस त्यांना अटक करण्याचे धाडस करीत नाहीत.
एकाही फरार बुकीमालकाला अद्याप अटक केलेली नाही. डॉ. अमृतकर यांनी एजंटांना लक्ष्य न करता बुकीमालकांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.