कोल्हापूर : शहरातील विविध महाविद्यालयांबाहेर व उद्यानात गटा-गटाने हुल्लडबाजी करून युवतींना त्रास देणाऱ्या २० युवकांना निर्भया पथकाने खाकीचा प्रसाद देत कारवाई केली. त्यानंतर दोनशे रुपये दंड भरून घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. शनिवारी सकाळी झालेल्या कारवाईने युवकांची पळताभुई झाली. पथकाने दोन महिन्यांत १५० युवकांवर कारवाई केली.शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात युवक गटा-गटाने उभे राहून हुल्लडबाजी करीत असतात. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात थांबून युवतींची छेड काढणे, भरधाव दुचाकी चालविणे, मोठ्याने हॉर्न वाजविणे, मुलींचा पाठलाग करणे असे प्रकार घडत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून निर्भया पथकाकडून कारवाई सत्र सुरू आहे. पथकाने शनिवारी विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, शाहू कॉलेजसह उद्यान परिसराला अचानक भेट देत हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांची धरपकड करीत त्यांना पोलीस ठाण्यात खाकीचा प्रसाद दिला. पालकांसमोर कानउघाडणी करीत प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.यांच्यावर झाली कारवाईआनंद राजू साळोखे (वय २२), पवन अशोक सुतार (२२), शुभम राजू साळोखे (२३, तिघे रा. सुतारवाडा, दसरा चौक), इर्शाद महम्मद येळापुरे (२१), हसीन मेहबूब मुजावर (२४, दोघे रा. शिरोली पुलाची-माळवाडी, ता. हातकणंगले), अमर शिवाजी जाधव (१९, रा. तिसंगी, ता. गगनबावडा), रघुनाथ प्रकाश शिंदे (१९, रा. आसंडोली, ता. गगनबावडा), आशिष अनिल माने (१९, रा. नागाळा पार्क), जुनेद आरिफ मुल्ला (१९, रा. विश्वजित अपार्टमेंट, नागाळा पार्क), रोहित दिलीप चव्हाण (२०, रा. कागल), अनिकेत प्रेमजित पोवार (१९, रा. आंबेगल्ली, कसबा बावडा), शुभम विलास पाठक (१९, रा. कुंडलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली), सूरज कृष्णात पाटील (२०, रा. पाडळे खुर्द, ता. करवीर), अवधूत धनाजी कलिकते (२१, रा. शिरगाव, ता. राधानगरी), सूरज ठाकूर मुल्ला (२०, रा. बिरदेवनगर, रेंदाळ, ता. हातकणंगले), सुबहित शमशुद्दीन मुजावर (२१, रा. अकबर मोहल्ला, सोमवार पेठ), फैजल मुन्ना खान (२४, रा. वेताळ तालीम परिसर, शिवाजी पेठ), करण राजेंद्र सुतार (१९, रा. गणेश कॉलनी, वडणगे), ताबीश निसार चोरगस्ती (२०, रा. कागदी गल्ली, शुक्रवार पेठ), सचिन महादेव गावडे (१९, रा. मेनन कॉलनी, सरनोबतवाडी).