शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : सदर बजारमध्ये दुचाकी पेटवली, अ‍ॅपे रिक्षाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:18 AM

विचारेमाळ येथील शाहू कॉलेजसमोर रस्त्याकडेला पार्किंग केलेली दुचाकी पेटवून अ‍ॅपे रिक्षाची तोडफोड केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. अज्ञातांचे हे कृत्य असून, वाहन मालकांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्यक्तिद्वेषातून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात आहे.

ठळक मुद्देसदर बजारमध्ये दुचाकी पेटवली, अ‍ॅपे रिक्षाची तोडफोडअज्ञातांचे कृत्य : शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार

कोल्हापूर : विचारेमाळ येथील शाहू कॉलेजसमोर रस्त्याकडेला पार्किंग केलेली दुचाकी पेटवून अ‍ॅपे रिक्षाची तोडफोड केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. अज्ञातांचे हे कृत्य असून, वाहन मालकांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्यक्तिद्वेषातून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात आहे.अधिक माहिती अशी, जमीर नुरमुहमद शेख यांची दुचाकी (एम. एच. ०९ सी. पी. २८३१) आहे. तर आय्याज दस्तगीर गजबर यांची अ‍ॅपेरिक्षा (एम. एच. ०९ बी. सी. ५७७६) आहे. जमीर हे महाद्वार रोडवर हातगाड्यावर किरकोळ साहित्य विक्री करतो, तर आय्याज यांचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय आहे. दोघेही विचारेमाळ येथे राहतात. त्यांनी रविवारी दुचाकी व अ‍ॅपेरिक्षा शाहू कॉलेजसमोर रस्त्याकडेला पार्किंग केल्या होत्या.

सोमवारी सकाळी पाहतात, तर दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. अ‍ॅपेरिक्षाची तोडफोड केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हे कृत्य केले. दोन्ही वाहनांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

हा प्रकार पूर्ववैमनस्य आणि व्यक्तिद्वेषातून घडल्याची चर्चा परिसरात आहे. शेख आणि गजबर या दोघांचा कोणाशी वाद आहे काय, यासंबंधी पोलीस चौकशी करीत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील करीत आहेत.

 

टॅग्स :bikeबाईकkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी