शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

कोल्हापूर :  विनाअनुदानित शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; ‘महाआरती’ करून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 4:21 PM

विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी ‘शासनाची महाआरती’ आंदोलन केले. शिक्षक दिनादिवशी त्यांनी शाळा बंद ठेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करीत विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्दे विनाअनुदानित शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन‘महाआरती’ करून नोंदविला निषेध

कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी ‘शासनाची महाआरती’ आंदोलन केले. शिक्षक दिनादिवशी त्यांनी शाळा बंद ठेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करीत विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदविला. महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.येथील कोल्हापूर विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर दुपारी साडेबारा वाजता शिक्षकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेसमोर मराठवाड्यातील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते ‘शासनाची महाआरती’ करून सर्व आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार आणि शासनाचा निषेध केला.

कृती समितीच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार यांना दिले. या आंदोलनात कृती समितीचे विभागीय अध्यक्ष सुनिल कल्याणी, उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सभाअध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक दादा लाड, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, माजी शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड, राजेश वरक, पुंडलिक रहाटे, आनंदा वारंग, गजानन काटकर, एस. एम. पाटील, आदी सहभागी झाले. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर