शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

कोल्हापूर :  मामाच्या गावाची अनोखी सहल, दोनदिवसीय मोफत सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 7:07 PM

मामाचा गाव, आठवणीतील खेळ, निसर्ग, डोंगर, दऱ्या, मोकळे आकाश, पायवाटा... असे वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी १० ते २२ नोव्हेंबर असे दोनदिवसीय मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिल रायडर्स ग्रुपचे प्रमुख प्रमोद पाटील व संवेदना फौंडेशनचे राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमामाच्या गावाची अनोखी सहलदोनदिवसीय मोफत सहल

कोल्हापूर : मामाचा गाव, आठवणीतील खेळ, निसर्ग, डोंगर, दऱ्या, मोकळे आकाश, पायवाटा... असे वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी १० ते २२ नोव्हेंबर असे दोनदिवसीय मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिल रायडर्स ग्रुपचे प्रमुख प्रमोद पाटील व संवेदना फौंडेशनचे राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रमोद पाटील म्हणाले, शाळा, क्लास, टी.व्ही., मोबाईल या सगळ्यांमध्ये मुलांचे बालपणच हरवून जात आहे. त्यामुळे मुलांना शारीरिक व मानसिक आरोग्य, एकाग्रता यांच्या समस्यांनी ग्रासलेले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी इतिहास, पर्यावरण, निसर्गतील विज्ञान समजावून घेण्याच्या हेतूने संवेदना फौंडेशन, हिल रायडर्स, कुतूहल फौंडेशन यांच्यातर्फे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन केले आहे.राहुल चिकोडे म्हणाले, या सहलीमध्ये १२ ते १४ वयोगटातील मुले-मुली सहभागी होऊ शकतात. पर्यावरण अभ्यासक अनिल चौगुले, कुतूहल फौंडेशनचे सचिन जिल्लेदार हे मार्गदर्शन करणार आहेत. दोनदिवसीय सहली पूर्णपणे मोफत आहेत. फटाके न उडविणाऱ्या मुलांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे.

गोखले कॉलेजजवळील हुतात्मा पार्क येथून सकाळी आठ वाजता सहलीस सुरुवात होणार आहे; तर समारोप दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता हुतात्मा पार्क येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी शाहूपुरी येथील समिट अ‍ॅडव्हेंचर्स, न्यू शाहूपुरी येथे संपर्क साधावा. याप्रसंगी पर्यावरण अभ्यासक अनिल चौगुले, सूरज ढोली, सचिन जिल्लेदार, आदी उपस्थित होते.

या ठिकाणी भेट देणारशहरातील ऐतिहासिक वारसास्थळे, साठमारी, जिल्हा पोलीस मुख्यालय येथील उंच तिरंगा ध्वज, पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची ओळख, राजर्षी शाहू जन्मस्थळ, टाउन हॉल म्युझियम, दुर्मीळ वृक्षपरिचय, रजपूतवाडी येथे शिवारभेट, गुऱ्हाळ भेट, किल्ले पन्हाळा सैनिक स्कूल येथे रात्रमुक्कम, फिल्म शो, आकाशदर्शन, कॅम्प फायर, सूर्योदय, निसर्गखेळ, पक्षी निरीक्षक, पन्हाळागड दर्शन याबरोबरच आठवणीतले खेळ, सूरपाट्या, गोट्या, लगोरी, आट्यापाट्या अशा आनंददायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटनkolhapurकोल्हापूर