ओळ - तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर संपूर्ण कोल्हापूर शहर सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत अनलॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर सोमवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर नागरिकांची तसेच वाहनांची गर्दी झाली. छाया : आदित्य वेल्हाळ.
फोटो क्रमांक - ०५०७२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०३
ओळ - तब्बल तीन महिन्यांनंतर सराफी दुकान उघडताना साफसफाई, स्वच्छता झाली. एका सराफ व्यावसायिकाने चक्क रस्त्यावरून दुकानाची पूजा केली. छाया : आदित्य वेल्हाळ.
फोटो क्रमांक - ०५०७२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०४
ओळ - कोल्हापुरातील चप्पल लाईनवरील एक दुकानदार सोमवारी आपल्या दुकानात दर्शनी भागात चपला लावून ग्राहकांच्या सेवेत पुन्हा सक्रिय झाला. छाया : आदित्य वेल्हाळ.
फोटो क्रमांक - ०५०७२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०५
ओळ - कोल्हापुरातील कोरोना संसर्गामुळे साड्यांची, कापडांची दुकाने बंद राहिली. सोमवारी अनलॉक होताच एक महिला ग्राहकांनी दुकाने उघडल्याची संधी साधत दुकानात जाऊन साडी खरेदीचा आनंद लुटला. छाया : आदित्य वेल्हाळ.
फोटो क्रमांक - ०५०७२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०६
ओळ - कोल्हापुरात कपड्यांच्या दुकानात ग्राहकांना आकर्षित करण्याकरीता दुकानाच्या दारात मेल-फिमेल स्टॅच्यू लावण्यात महिला कर्मचारी व्यस्त होती. छाया : नसीर अत्तार