कोल्हापूर : आरोग्यजागृतीचा संदेश देण्याबरोबरच अॅथलेटिक्स खेळाला प्रोत्साहन मिळावे, याकरिता ‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर महामॅरेथॉनच्या टी-शर्टचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माणिकचंद आॅक्सिरिचचे सागर लालवानी, ट्रान्सट्रेडचे दीप संघवी, द युनिक अकॅडमीचे हेमंत जोशी, ट्रेडनेटचे संदीप कुलकर्णी, ‘व्हिंटोजिनो’चे रिजनल सेल्स मॅनेजर संजय पोलावार, महालक्ष्मी इस्पात स्टीलचे अभिषेक गांधी, प्रियदर्शन पॉलिसॅकचे शीतल संघवी, पिंकेथॉनच्या अॅम्बॅसडर आरती संघवी, कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनचे चेतन चव्हाण, ‘लोकमत’ कोल्हापूरचे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
नियोजनाचा उत्कृष्ट नमुना‘लोकमत महामॅरेथॉन’चे हे दुसरे पर्व असून, मागील पर्वात उत्कृष्ट नियोजनाचा नमुना ‘लोकमत’ने कोल्हापूरवासीयांना दाखवून दिला आहे. यंदाही सहा जानेवारीला होणारे दुसरे महामॅरेथॉन पर्वही उत्कृष्टच असणार आहे. या सोहळ्यास माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.- संजय शेटे,अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स
बेस्ट इव्हेंट‘लोकमत महामॅरेथॉन’ अर्थात बेस्ट इव्हेंट असून, लोकांना हवीहवीशी अशी ही स्पर्धा आहे. तिला माझ्यातर्फे शुभेच्छा!- संदीप कुलकर्णी, ट्रेडनेट
‘लोकमत महामॅरेथॉन’ अर्थात परफेक्शन!मी एक स्वत: मॅरेथॉनर आहे. अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील ही सर्वांत चांगली मॅरेथॉन असल्याचे माझे मत आहे; कारण उत्कृष्ट नियोजन आणि परफेक्शन याबाबत ‘लोकमत’ एक नंबर आहे.- दीप संघवी, ट्रान्सट्रेड
उत्कृष्ट संयोजनउत्कृष्ट आॅर्गनायझरचा नमुना म्हणून ‘लोकमत महामॅरेथॉन’कडे पाहिले जाते. कारण हा अनुभव माझ्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. यंदा मीही २१ किलोमीटर स्पर्धेत सहभागी होत आहे. या महामॅरेथॉनला माझ्यातर्फे व माणिकचंद आॅक्सिरिचतर्फे हार्दिक शुभेच्छा!- सागर लालवानी, माणिकचंद आॅक्सिरिच
‘लोकमत’ने जिवंतपणा आणलामहामॅरेथॉनच्या पहिल्या पर्वातील उत्कृष्ट नियोजनामुळे कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषत: या स्पर्धेमुळे ‘महामॅरेथॉन’मध्ये लाईव्हनेस अर्थात जिवंतपणा आला. कोल्हापूरकर चांगल्या कामाच्या पाठीशी सातत्याने राहतात, त्याचीही पोचपावती होती. त्यामुळे यंदाही शाळा, महाविद्यालये, क्रीडा संघटना, शासकीय कर्मचारी, अधिकारी, खेळाडू, लोकप्रतिनिधी, आदी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत आहेत. यंदाही ‘लोकमत महामॅरेथॉन’चे उत्कृष्ट संयोजन करून कोल्हापूरच्या वैभवात आणखी भर घालू.- वसंत भोसले, संपादक, लोकमत