कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्तारूढ शिंदे-कणेरकर पँनेलने एकतर्फी विजयी मिळवला. सर्वच्या सर्व पंधरा जागा जिंकत मोठ्या फरकांनी विरोधा पँनेलचा सुपडासाफ केला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्या पँनेलने आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम राखत शिंदे-कणेरकर पँनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला.
रमणमळा येथील शासकीय गोदामात आज, मंगळवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर व उमेश निगडे यांची प्रतिष्ठा पणास लागली होती. अखेर शिंदे-कणेरकर पँनेलने एकतर्फी विजयी मिळवत बंँकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले.
कोल्हापूर अर्बन बँकेच्या १५ जागांसाठी ५२ केंद्रावर रविवारी (दि.१३) १३ हजार ७९१ मतदान झाले. शिरीष कणेरकर व उमेश निगडे यांच्यात सत्तेसाठी टोकाचे प्रयत्न झाले. उमेदवारांची निवड करण्यापासून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी चढाओढ पाहावयास मिळाली. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा ८ टक्के मते वाढली होती. दोन्ही आघाड्यांनी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी टोकाचे प्रयत्न केले होते.